कुलदीप मोहिते कराड
कराड – दिनांक १६ ऑक्टोंबर
वेणूताई चव्हाण कॉलेज, कराडमधील अर्थशास्त्र विभागाच्यावतीने बालगृहास फळांचे वाटप करून साजरा करण्यात आला. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य, प्राध्यापक व विद्यार्थ्यांच्या योगदानातून कराड शहरातील कै. क्रांतिवीर माधवराव जाधव बालगृह (निरीक्षणगृह) येथे जाऊन फळांचे वाटप करण्यात आले. तेथील अधिकारी यांनी बालगृहाविषयी माहिती दिली.
अन्न ही माणसाची मूलभूत गरज आहे. अन्न मिळविण्यासाठी सर्वजण प्रयत्न करत असतात, परंतु त्या प्रयत्नाला सर्वांनाच यश येते असं नाही. आजही जगामध्ये उपाशीपोटी झोपणाऱ्या लोकांचे प्रमाण अधिक आहे. अनेकांना दोन वेळचे पुरेसे अन्न मिळत नाही, ही वस्तुस्थिती आहे. २०२२ च्या ग्लोबल हंगर इंडेक्स मध्ये भारताचा १०७ वा क्रमांक लागतो. यावरून असे स्पष्ट होते की, भारतामध्ये आजही उपाशीपोटी झोपणाऱ्या लोकांची संख्या पुष्कळ आहे. इतर देशांच्या तुलनेत भारतात हे प्रमाण अधिक आहे. भारताप्रमाणेच इतर देशांची स्थिती वाईटच आहे हे लोकसंख्या वाढीचे परिणाम आहेत. या विषयाचे गांभीर्य निर्माण व्हावे म्हणून संयुक्त राष्ट्रसंघाने १९८१ पासून ‘जागतिक अन्न दिन’ साजरा करण्यास सुरुवात केली. हा दिन साजरा करण्यामागे मुख्य उद्देश म्हणजे परिसरातील गोरगरीब, कुपोषित, निराधार लोकांना अन्न देणे. त्या विषयी जनजागृती करणे, अन्नाची नासाडी थांबवणे हे आहेत. म्हणूनच शाळा महाविद्यालयातून हा दिन साजरा केला जातो.