लोणीकंद (ता. हवेली) येथील ग्राम नगरीच्या सरपंच मोनिका श्रीकांत कंद यांनी वटपौर्णिमेच्या निमित्त वडाच्या झाडाचे वृक्षारोपण करत अनोखी वटपौर्णिमा साजरी केली असून समाजासमोर एक आगळावेगळा पर्यावरण पूरक वटपौर्णिमा साजरा करण्याचा आदर्श ठेवला आहे.
भारतीय संस्कृतीतील व समाज जीवनातील महत्त्वपूर्ण असणारा तसेच विशेषतः महिला भगिनींच्या जिव्हाळ्याचा असणारा वटपौर्णिमा सण लोणीकंद ग्रामनगरीच्या सरपंच मोनिका श्रीकांत कंद व महिला भगिनींनी अनोख्या पद्धतीने साजरा करत पतीच्या दीर्घायुष्यासह भावी पिढीला पर्यावरणपूरक आरोग्यदायी वातावरण तसेच निसर्गरम्य परिसर उपलब्ध करून देण्यासाठी वडाच्या झाडाचे वृक्षारोपण करत पर्यावरण पूरक अशी आदर्शवादी व समाजाला दिशा देणारी वटपौर्णिमा साजरी करत समाजासमोर एक अनोखा आदर्श ठेवला आहे.
पर्यावरण पूरक वटपौर्णिमा साजरी करण्यासाठी ग्रामपंचायत पदाधिकारी व गावातील ग्रामस्थांनी व पदाधिकाऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर उत्साह पूर्ण सहभाग नोंदवत वृक्षारोपण करण्यासाठी श्रमदान करत खड्डे खोदत वृक्षारोपण करण्यासाठी अनमोल सहभाग दर्शवला.
यावेळी लोणीकंद ग्राम नगरीच्या प्रतं नागरिक सरपंच मोनिका कंद उपसरपंच राहुल शिंदे , आदर्श सरपंच श्रीकांत कंद, पुणे कृषी बाजार समितीचे माजी उपसभापती नारायणराव कंद, माजी उपसरपंच नंदकुमार कंद, ग्रामपंचायत सदस्य डॉ सोनाली जगताप, प्रियांका झुरंगे, सरस्वती दळवी, दिपाली राऊत, सुधीर कंद, शालेय व्यवस्थापन समितीचे माजी अध्यक्ष जय कंद, स्वप्निल कंद, गुलाब कंद, दत्तात्रय जगताप, ज्ञानोबा तापकीर, विनायक यशवंत, धनुबाई लोखंडे, गंगाधर दळवी, ग्रामविकास अधिकारी बोरावणे भाऊसाहेब यासह विविध मान्यवर उपस्थित होते.