Monday, November 18, 2024
Homeताज्या बातम्यालोकनेते स्वर्गीय गोपीनाथ मुंढे यांनी जयंती वाघोली येथे भाजपा कार्यकर्त्यांकडून साजरी

लोकनेते स्वर्गीय गोपीनाथ मुंढे यांनी जयंती वाघोली येथे भाजपा कार्यकर्त्यांकडून साजरी

कोरेगाव भिमा – वाघोली (ता.शिरूर) येथे लोकनेते स्वर्गीय गोपीनाथ मुंढे यांची जयंती वाघोली येथे भाजपा युवा मोर्चाच्या वतीने साजरी करण्यात आली.

दिनांक  दि:१२ डिसेंबर रोजी लोकनेते स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे  यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून साजरी करण्यात आली.

    यावेळी भाजपा युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष गणेश कुटे,जिल्हा उपाध्यक्ष राहुल कुटे तसेच तुषार कुटे, चेतन राऊत, दिनेश पाटील,योगेश माळी,जितु पाटील आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी लोकनेते स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांनी भाजप पक्ष चांदया पासून बांध्यापर्यंत पोहचवत घरा-घरात भाजपचा कार्यकर्ता बनविला व पक्षाचा वटवृक्ष वृध्दिंगत केला.मुंडे साहेबांनी आणीबाणीच्या काळात तुरुंगवासही भोगला, आणीबाणीला विरोध करण्याचे धाडस त्यांनी दाखवलं, आणिबाणीतल्या तुरुंगात यशवंत केळकर यांच्यासारख्या कुशल संघटकांचे मार्गदर्शन मिळाले, प्रत्यक्ष राजकारणात भारतीय जनसंघापासुन वसंत भागवत यांचे मार्गदर्शन मिळाले,आणि आणीबाणीनंतर मुंडे साहेबांच्या अंगी नेतृत्व गुण आणखी झळकले,१९९५ मद्ये भाजप सेना राज्यात सत्तेवर आले आणि त्या सरकारमध्ये मुंडे साहेब राज्याचे गृहमंत्री झाले,मुंडे साहेब हे कुशल प्रशासक होते, केवळ कठोर निर्णय म्हणजे प्रशासक व प्रशासन नसते तर परिणामकारक क्रांतिकारी बदल करणारे निर्णय घेणे, निर्णयाची अमलबजावणी करणे,गृहमंत्री असताना गुन्हेगारी विरोधात धडक कार्यवाही केली, पोलिसांना अधिकार दिले, “एन्काऊंटर”हा शब्द त्याच काळात रूढ झाला, मुंबईतील टोळी युद्धाला व गुन्हेगारीला आळा घालण्याचं काम मुंडे साहेबांनी केलं.अत्यंत स्वच्छ चारित्र्याचे मंत्री म्हणून आजही त्यांचा गौरव होतो असे उद्गार भाजपा युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष गणेश कुटे यांनी व्यक्त केले.

संबंधित लेख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!