- ‘ईडीची धाड पडते म्हणून हृदयपरिवर्तन नको!’
- ज्या देशाचा सामान्य माणूस मोठा, तो देश मोठा
समाजामुळेच राजा हा राजा होतो, समाजाने त्याला ज्याकरिता कारभार सोपवला, ते त्याने केले नाही, तर त्याला समाज पायउतार करतो. जसा समाज असेल, तसा राजा असतो, देश मोठा व्हायचा असेल, तर समाज मोठा झाला पाहिजे, ज्या देशाचा सामान्य माणूस मोठा, तो देश मोठा, म्हणून समाजप्रबोधनाचे खूप महत्व आहे. आणि समाजप्रबोधनात संस्थांची भूमिका महत्वाची असल्याचे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी केले.(Rss Mohan Bhagvat News)
विलेपार्ले येथील लोकमान्य सेवा संघाच्या १०१ व्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित सामाजिक परिवर्तन – संस्थांची भूमिका या विषयावरील व्याख्यानात भागवतांनी आपले विचार मांडले. समाजात आचरणाचे परिवर्तन हृदयपालटामुळे व्हायला हवे. पोलिस उभा आहे म्हणूनही लोकांच्या आचरणात परिवर्तन होते. ईडीची धाड पडू नये म्हणूनही होते. ते नको आहे, मनापासून झाले पाहिजे. बुद्धीने समजून, विवेकाने व्हायला हवे असे परिवर्तन घडवायची भूमिका ही प्रत्येक सामाजिक संस्थांची जबाबदारी असल्याची भूमिका भागवत यांनी मांडली. (राष्ट्रीय स्वयंसेवक संघ)
आज आपण सर्व गोष्टी आउटसोर्स करतो, ठेका काढतो, जी कामे आपण करायला हवी तिची अपेक्षा ठेका दिलेल्या लोकांकडून करतो. देशाचे काम करायला पण नेत्यांना ठेका देतो आणि अपेक्षा करतो की, त्यांनी सर्व कामे केली पाहिजेत, घरासमोर कचरा उचलायला लोक ठेवतो, जे आपलं काम आहे त्यासाठी व्यवस्था निर्माण करतो. तसं देशाचं काम करायला पण नेत्यांना ठेका देतो आणि अपेक्षा करतो की, त्यांनी सर्व कामे केली पाहिजेत, अशी खंत त्यांनी व्यक्त केली. (राष्ट्रीय स्वयंसेवक संघ सरसंघचालक डॉ. मोहन भागवत )
शाळा-कॉलेज, घर आणि समाजामध्ये निरनिराळे कार्यक्रम करणाऱ्या संस्था या तीन ठिकाणांहून माणसाला शिक्षण मिळते. त्यामुळे, समाज परिवर्तनात संस्थांची भूमिका फार मोठी आहे, अशी भावनाही त्यांनी व्यक्त केली.आज कुटुंबांच्या संबंधांचे बांध ढिले व्हायला सुरुवात झाली आहे, आपल्याकडे टोकाचा जडवाद आणि भोगवाद हेतुपुरस्सर रुजवला गेला, त्यामुळे सुशिक्षित वर्गामध्ये कुटुंबसंबंधांतील विस्कळीतता जास्त दिसते; त्या प्रमाणात अशिक्षित वर्गामध्ये ती दिसून येत नाही. समाजातील आपलेपणा वाढला पाहिजे, समाज, देश,राष्ट्रासाठी मी किती वेळ खर्च करतो, याचा विचार व्हायला हवा, असे त्यांनी यावेळी नमूद केले.(RSS)
सर्व कुटुंबाने एकत्र बसून आठवड्यातून एक दिवस गप्पा मारणे, आपला वंश, परंपरागत रीती, इ. वर चर्चा व्हावी व नवीन पिढीच्या प्रश्नांची समर्पक उत्तरे देऊन समाधान व्हावे, पाणी वाचवणे, प्लास्टिक हटवणे., वृक्षारोपण, प्रत्येक जण घरात एवढं करूच शकतो, समरसता,नागरी शिष्टाचार अतिशय आवश्यक आहेत. स्वदेशी म्हणजे फक्त विदेशी वस्तू वापरू नये असे नाही, विनोबा भावे म्हणतात स्वदेशी म्हणजे स्वावलंबन आणि अहिंसा. आम्ही त्यात आणखी एक भर घालतो ते म्हणजे साधेपणा, असे डॉ. भागवत म्हणाले.(RSS Chief Mohan Bhagvat)
नव्या पिढीला छत्रपती शिवाजी महाराज आणि महाराणा प्रताप माहित नाहीत, अशी खंतही भागवत यांनी व्यक्त केली. सामाजिक परिवर्तनात प्रत्येक व्यक्ती महत्त्वाची भूमिका बजावते. अत्यंत भौतिकवादी जीवनशैलीने समाजाचा ताबा घेतला आहे आणि त्यामुळे कौटुंबिक बंधांवर परिणाम होत असल्याची चिंता त्यांनी व्यक्त केली.आमच्या समाजाला आणि आमच्या कुटुंबांना अधिक चांगल्या बंधांची गरज आहे. एखाद्या राष्ट्राचा उदय आणि पतन हे समाजाच्या विचार प्रक्रियेशी आणि मूल्यांशी निगडीत असते. समाजातील आपलेपणा वाढला पाहिजे. समाज, देश,राष्ट्रासाठी मी किती वेळ खर्च करतो, याचा विचार व्हायला हवा, असे सरसंघचालकांनी नमूद केले.(Rashtriy Swayamsevak Sangh)