वढू बुद्रुक (ता. शिरूर) येथे मानसिक संतुलन हरवेल्ल्या दोन महिलांवर योग्य औषधोपचार करत त्यांना त्यांच्या मधाप्रदेशतील कुटुंबाकडे पुनः सोपवण्यात आल्याने महीलांनिबव कुटुंबीयांनी माहेर संस्थेचे आभार मानले यातील एका महिलेचे कुटुंबीयांनी तर महिलेला मृत समजून सर्व विधीही केले होते.(MAHER Sanstha)
माहेर संस्था गेली सत्तावीस वर्षांपासून निराधार परित्यक्ता,अनाथ महिला मुले पुरुष वयोवृध्द तसेच मानसिक संतुलन बिघडलेल्या महिला पुरुष व गाव पातळीवर विविध प्रकल्पात कार्यरत असते. सध्या माहेरचे कार्य सात राज्यांमध्ये चालू आहे .त्यातील माहेर संचलित वात्सल्यधाम प्रकल्प ज्यांचे मानसिक संतुलन बिघडलेल्या महिला ज्या की बेवारस अवस्थेतरस्त्यावर फिरताना मिळून आलेले असतात त्यासाठी कार्यरत आहेत.
या प्रकल्पातील दोन महिलांचे मध्य प्रदेश येथे जाऊन माहेरचे कर्मचारी रूपाली त्रिभुवन व अजय वानखेडे यांनी पुनर्वसन केले. प्रवेशिता अंजली कोल या ६ फेब्रुवारी २०२३ रोजी लोणीकंद पोलिसांमार्फत प्रवेशित झाल्या होत्या प्रवेशा दरम्यान अंजली या अतिशय बिकट अवस्थेत होत्या सुरुवातीला कोणतीही माहिती सांगता येत नव्हती औषधोपचार वर सतत समुपदेशन करण्यात आले. समुपदेशन दरम्यान त्यांनी मध्यप्रदेश मधील खेरानी गाव जिल्हा कटनी असा पत्ता सांगितला त्या पद्धतीने तिला त्या पत्तेवर घरी घेऊन जाण्यात आले असता घर मिळणारे घरी गेल्यावर समजले की अंजली या सहा वर्षांपासून घरातून निघून गेली होती त्यांनी दोन वर्षे शोध घेतला व त्यानंतर त्यांनी आशा सोडली तिला मृत समजून त्यांनी सर्व कार्य पार पाडले तिला भेटल्यावर सर्व कुटुंबाच्या डोळ्यात आनंदाश्रु दिसून आले.
दुसरी प्रवेशिता नामे सुमित्रा साहू ही दिनांक २६ ऑक्टोबर २०२३ रोजी प्रवेशित झाली होती त्यांच्याशी संवाद साधून तसेच औषध उपचाराने पतीचा फोन नंबर त्यांना आठवला त्या फोन क्रमांकावर संपर्क साधत पतीसोबत संवाद झाला त्यादरम्यान समजून आले की त्यांचे पती अपंग असल्यामुळे एवढ्या लांब येऊ शकत नसल्याने. माहेरचे कर्मचारी यांनी त्यांना मध्य प्रदेश येथे जाऊन त्यांचे पुनर्वसन करण्यात आले. सुमित्रा या तीन वर्षापासून घरातून बेपत्ता होत्या त्यांना त्यावेळेस तीन महिन्याचे बाळ होते .त्यांचा त्यांच्या कुटुंबियाने आनंदाने स्वीकार केला. दोन्ही कुटुंबाने माहेर संस्थेची व संस्थेच्या संस्थापिका सिस्टर लुसी कुरियन यांचे आभार मानले