महिला भगिनींचा सहभाग लक्षणीय
कोरेगाव भीमा – सणसवाडी (ता.शिरूर) येथील सकाळ मराठा समाजाच्या वतीने मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षण उपोषणाच्या पाठिंब्यासाठी सणसवाडी येथे मराठा बांधवांकडून मशाल मोर्चा काढण्यात आला यावेळी मोठ्या संख्येने महिला भगिनी, युवक व ग्रामस्थांची संख्या लक्षणीय होती.
मराठा बांधवांना आरक्षण मिळावे यासाठी अंतरवाली येथे मनोज जरांगे पाटील यांचे आमरण उपोषण सुरू आहे.या उपोषणाला पाठिंबा व मराठा आरक्षण तातडीने मिळावे यासाठी सणसवाडी येथील सकल मराठा समाजाच्या वतीने मशाल मोर्चा काढण्यात आला यावेळी छत्रपती शिवाजी महाराज, छञपती संभाजी महाराज,एक मराठा लाख मराठा, मराठा आरक्षण याविषयी घोषण देण्यात आल्या.
यावेळी उपस्थितांना पुणे जिल्हा नियोजन समिती माजी सदस्य पंडित दरेकर , रांजणगाव गणपतीचे देवस्थानचे अध्यक्ष विजयराज दरेकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे शिरूर तालुका उपाध्यक्ष दत्तात्रय हरगुडे, सणसवाडी गावच्या सरपंच सुवर्णा दरेकर, उपसरपंच दत्तात्रय हरगुडे ,काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष वैभव यादव, शिरूर पंचायत समितीच्या माजी सदस्या सविता दरेकर, ग्रामपंचायत सदस्य राजेंद्र दरेकर, सागर दरेकर , मोहन हरगुडे, ग्रामपंचायत सदस्या सुनंदा दरेकर, रूपाली दरेकर ,तनुजा दरेकर ,संगीता हरगुडे सुनिता दरेकर, अलका दरेकर, माजी चेअरमन सुहास दरेकर , माजी उपसरपंच बाबा दरेकर, रामदास दरेकर,सुरेश हरगुडे, विदयाधर दरेकर,काळुराम दरेकर, निलेश दरेकर, सतीश दरेकर, सुभाष दरेकर, विठ्ठल दरेकर, संतोष शेळके, विकास हरगुडे, अशोक हरगुडे, विक्रम भुजबळ व महिला आणि ग्रामस्थ मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.