तळेगाव ढमढेरे प्रतीनिधी जालिंदर आदक
तळेगाव ढमढेरे (ता.शिरूर) येथील भैरवनाथ नगरच्या वेळनदी वरील कोल्हापूर पद्धतीच्या के टी बंधाऱ्याची दुरुस्तीसाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाच्या वतीने उपविभागीय शाखा अभियंता श्रीकांत राऊत यांनी पाहणी केली.
या बंधाऱ्याच्या दोन्ही बाजूचे लोखंडी ग्रील मागील पुरात वाहून गेल्याने विद्यार्थी प्रवास करत असताना अपघात होण्याची शक्यता असल्याने बंधारा लवकरात लवकर दुरुस्त करावा अशी मागणी निवेदनाद्वारे शाळा ,विद्यालय ग्रामप्रशानास केली होती. ग्रामपंचायतच्या वतीने महाराष्ट्र जीवन प्राधिकरण पाणी पुरवठा योजनेंतर्गत सन १९९८ च्या दरम्यान तयार करण्यात आल्याने या विभागाला बंधारा दुरुस्तीबाबत पत्रव्यवहार केला होता.
त्यानुसार शुक्रवार (दि.१५) रोजी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे उपविभागीय अभियंता यांच्या वतीने बंधाऱ्याची पाहणी केली व ग्रामपंचायतला सदर बंधारा हा पाणीपुरवठा योजना महाराष्ट्र जीवन प्राधिकरण हि योजना राबविण्यासाठी बांधण्यात आला असून योजना देखभाल दुरुस्तीसाठी बंधाऱ्यासहित ग्रामपंचायत तळेगाव ढमढेरे यांच्याकडे हस्तांतरित करण्यात आली आहे. तसेच सदर बंधारा हा दुरुस्तीच्या कामगारांसाठी फ्लेट टाकणे,काढणे यासाठी असून स्थानिक नागरिकांच्या ये – जा करण्यासाठी नसून जीवितहानी होण्यापासून टाळण्यासाठी ग्रामपंचायत स्तरावर कार्यवाही करण्याबाबत पत्र सरपंच अंकिता भुजबळ व उपसरपंच मच्छिंद्र भुजबळ यांच्याकडे सुपूर्द केली आहे.