आव्हाळवाडी शाखाध्यक्ष ते युवा मोर्चा राज्य उपाध्यक्ष अशी यशस्वी वाटचाल करणारे ग्रामीण भागातील विश्वसनीय नेतृत्व
वाघोली – भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष राहुल लोणीकर यांनी भारतीय जनता युवा मोर्चा महाराष्ट्र राज्य पदाधिकाऱ्यांची नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या. यामध्ये लोणीकर यांनी निष्ठावंत कार्यकर्ते गणेश कुटे यांची भाजप युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षपदी निवड केली. कुटे यांच्या निवडीबद्दल त्यांचे अभिनंदन होत आहे. तसेच सर्वसामान्य शेतकरीच कष्टकरी कुटुंबातील स्वकर्तुत्वाने समाजात आदराचे स्थान मिळविलेल्या गणेश कुटे यांची निवड केल्याने सर्व सामाजिक स्तरातून मोठ्या प्रमाणावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
गणेश कुटे यांची राज्य उपाध्यक्षपदी वर्णी लागल्याबद्दल माजी राज्यमंत्री संजय भेगडे, आमदार राहुल कुल, भाजप नेते विक्रांत पाटील, राहुल लोणीकर, प्रदीप कंद, शरद बुट्टे पाटील, हवेली तालुकाध्यक्ष संदीप भोंडवे, भाजप नेते रोहिदास उंद्रे, सुदर्शन चौधरी, संदीप सातव, ग्रामपंचायत अविनाश कुटे, प्रदीप सातव पाटील, जयप्रकाश सातव पाटील, गणेश सातव, विजय जाचक आदींनी अभिनंदन केले आहे.
गणेश कुटे यांची यशस्वी शेतकरी पुत्र,उद्योजक ते युवा मोर्चा राज्यउपाध्यक्ष नेत्रदीपक वाटचाल –
पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील भाजपचा एक निष्ठावंत कार्यकर्ता गणेश कुटे यांची म्हणून ओळख आहे. अव्हाळवाडी येथे शेती तर कोरेगाव भिमा येथील वाडी फाट्यावर ज्ञानेश्वर गव्हाणे यांच्या येथे वेल्डींगचा व्यवसाय प्रामाणिक कष्ट करत स्वकष्टाने सर्व उभे करत सामाजिक बांधिलकी जपली.
समाजात काम करताना गणेश कुटे यांनी ऐंशी नव्वद टकके समाजकारण व दहा टक्के हे राजकारणाचे सूत्र जपल्याने जनसामान्यांमध्ये एक वेगळे स्थान निर्माण झाले आहे.
हवेली तालुक्यातील आव्हाळवाडी या छोट्या गावात भाजपची शाखा स्थापन करून कुटे यांनी शाखाध्यक्ष म्हणून कामाला सुरुवात केली. गावातील व परिसरातील सर्वसामान्यांची कामे करत त्यांना न्याय देण्याचे महत्त्वाचे काम केले. कामाचा वेग व जनसामान्यांशी जुळलेली नाळ यामुळे गोरगरीब व सर्वसामान्य नागरिकांना गणेश कुटे यांच्या विषयी विश्वास वाढला प्रत्येक काम हक्काने सांगावे व ते गणेश कुटे यांनी तत्काळ पूर्ण करावा असे विश्वासाचं सूत्र तयार झालं.
यामुळे तालुक्यातील सर्वसामान्य नागरिकांशी व्यापक जनसंपर्क झाला त्यामुळे साहजिकच गणेश कुटे यांनी अनेक गावातील विविधांगी प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न केले.
भाजपला एक निष्ठावंत व सक्रीय कार्यकर्ता मिळाल्याने पक्षाने त्यांच्या कार्याची दखल घेवून हवेली तालुका सरचिटणीस, तालुका उपाध्यक्ष, युवा मोर्चा अध्यक्ष आदी विविध पदांवर काम करण्याची संधी दिली. विविध पदाची जबाबदारी समर्थपणे पेलत तालुक्यातील गावांमध्ये कमळ फुलवण्यासाठी प्रयत्न केले. यावेळी गाव पातळीवर ते देशपातळीवर विरोधी विचारांची सत्ता होती त्या काळात नेते,कार्यकर्ते सत्तेकडे पळत होते पण गणेश कुटे यांच्या मनात भाजपचे कमळ मात्र पक्के रुतून बसले होते आणि त्यांच्या कार्याने हळूहळू फुलू लागले होते.
अगदी थोड्याच कालावधीत भाजप पक्षाचा निष्ठावंत कार्यकर्ता असल्याने पक्षाने सलग दोन वेळा हवेली तालुकाध्यक्ष पदावर काम करण्याची संधी दिली. भाजपची राज्यात सत्ता नसताना भाजपची ताकद वाढवण्यासाठी गावागावातील युवकांना संघटीत करून पक्ष संघटन मजबूत करण्याची मोलाची भूमिका कुटे यांनी बजावली. कुटे यांच्या सामाजिक कार्य बघता आव्हाळवाडी ग्रामस्थांनी बिनविरोध सदस्य ते उपसरपंच म्हणून त्यांना गावाचा विकास करण्याची संधी दिली.
एका सामान्य शेतकरी कुटुंबात जन्म झालेल्या तरुणाने आपल्या कर्तृत्वाने पक्षाचा निष्ठावंत कार्यकर्ता म्हणून भाजप शाखा अध्यक्ष ते भाजप युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश सचिव पदापर्यंत मजल मारली.
गणेश कुटे यांची भाजप पक्षाप्रती असलेली निष्ठा, सामाजिक कार्य व संघटन बघता त्यांची निमंत्रित सदस्य म्हणून निवड करण्यात आली. विविध पदावर जबादारी पार पाडत असताना नुकत्याच झालेल्या भारतीय जनता युवा मोर्चा महाराष्ट्र राज्य पदाधिकाऱ्यांच्या निवडीमध्ये कुटे यांना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष जबादारी सोपवण्यात आली असल्याने गाव पातळीवरील शाखाध्यक्ष ते राज्य पातळीवर उपाध्यक्ष ही वाटचाल मात्र खडतर,कष्टदायक, पक्षीय विचारधारेशी प्रामाणिक, एकनिष्ठ व हाडाच्या कार्यकर्त्याला न्याय देणारी तर आहेच पण एका शेतकरी पुत्राची नेत्रदीपक वाटचालही आहे.