कोरेगाव भीमा – हवेली तालुक्याचे भारतीय जनता पार्टीचे तालुकाध्यक्ष, महाराष्ट्रातील कुस्तिक्षेत्राला परिचित असणारे व जाणता राजा कुस्ती केंद्राचे संस्थापक अध्यक्ष संदीप भोंडवे यांची पुणे जिल्हा नियोजन समिती सदस्य पदी निवड करण्यात आली आहे.
पै संदीप भोंडवे यांनी भारतीय जनता पक्षाच्या गावोगावी शाखा उघडण्यासाठी काम केले असून याकामी त्यांना पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक व माजी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रदीप कंद यांचे मोलाचे सहकार्य मिळत आहे.नुकत्याच झालेल्या हवेली कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये या जोडीने सहकाऱ्यांच्या मदतीने मोठे यश मिळवले आहे.तसेच त्यांनी पूर्व हवेली परिसरात मोठ्या प्रमाणावर पैलवान, नागरिक , आप्तेष्ट ,मित्र व कार्यकर्ते यांचे घट्ट व मजिबुत जाळे मजबूत विणलेले आहे.
संदीप भोंडवे यांनी धरणग्रस्त शेतजमिनीचा राखीव शेरा कमी करण्यासाठी व्यापक जनसंपर्क उभारत मोठा लढा देत शेरा कमी केला आहे तसेच अवास्तव व अन्यायकारक वीजबिले याविषयी त्यांचा लढा शेतकऱ्यांना भावला असून त्यांनी गरीब घरची मुके दत्तक घेऊन राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर नामांकित पैलवान घडवले आहे त्यामुळे त्यांच्या संघटन कौशल्याने , माणुसकीने , मदतीच्या भावनेने व निरपेक्ष कार्याने मोठ्या प्रमाणावर जनमानसात जिव्हाळा व आपुलकी निरांन झाली आहे. त्यांचं पुणे जिल्हा नियोजन समितीच्या सदस्य पदी निवड होणे म्हणजे तळागाळातील व लाल मातीतील सच्चा कार्यकर्त्याला भारतीय जनता पक्षाने व प्रदीप कंद यांच्या माध्यमातून जिल्ह्याच्या स्तरावर काम करण्याची संधी मिळाल्याने नागरिकांनी व कार्यकर्त्यांनी मोठा अन्नदा व्यक्त केला आहे.
सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या सोडवण्यासह मूलभूत प्रश्न मार्गी लावणार आहे. कचरा ,पाणी व रोजगार यावर मोठे कमा करायचे आहे.भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून केंद्राच्या व राज्याच्या कल्याणकारी योजना सर्वसामान्यांपर्यंत पोचवण्यासाठी काम करणार असून ग्रामीण भाग व शेतकरी यांच्यासाठी विकासाचे काम करायचे आहे. – पै.संदीप भोंडवे , नवनिर्वाचित सदस्य पुणे जिल्हा नियोजन समिती