Thursday, November 21, 2024
Homeताज्या बातम्यापुन्हा एकदा कोरेगाव भिमा येथे आढळला बिबट्या... नागरिकांनी रात्र काढली जागून

पुन्हा एकदा कोरेगाव भिमा येथे आढळला बिबट्या… नागरिकांनी रात्र काढली जागून

गुरुवारी सकाळी बिबट्या जेरबंद केल्याने कोरेगाव भिमा ग्रामस्थांनी सुटकेचा निःश्वास टाकला होता पण हा आनंद रात्रीपर्यंत देखील टिकला नसून गुरुवारी रात्री पुन्हा एकदा बिबट्या दिसल्याने आनंद पार्क, आनंद नगर व रानातील वस्तीवरील नागरिकांनी जीव मुठीत धरून रात्र जागून काढावी लागली आहे

कोरेगाव भीमा – कोरेगाव भीमा (ता.शिरूर) कोरेगाव भीमा येथील नागरिकांनी गुरुवारी सकाळी एका बिबट्याला धाडस करत खोलीत बंद करत वन विभागाच्या सुपूर्त केले होते पण रात्री चेतन गव्हाणे यांना बिबट्या दिसल्याने पुन्हा एकदा ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून आनंद पार्क, आनंद नगर व रानातल्या वस्तीवरील लोकांनी रात्र अक्षरशः जागून काढली. (Once again a leopard was found in Koregaon Bhima… Citizens spent the night awake)

कोरेगाव भीमा येथील संसार कार्यालयाजवळ रात्रीच्या सुमारास चेतन गव्हाणे व कामगारांना बिबट्या दिसल्याने कोरेगाव भीमा मध्ये मोठ्या प्रमाणावर खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाल्याने नागरिकांनी रात्र अक्षरशः जागून काढली. बिबट्या आल्याचे समजताच कोरेगाव भीमाचे माजी सरपंच विजय गव्हाणे, माजी सरपंच अमोल गव्हाणे, पोलीस पाटील मालन गव्हाणे , स्वराज्य राष्ट्रनिर्माण पक्षाचे अध्यक्ष राजेशसिंह ढेरंगे, उद्योजक सुधाकर ढेरंगे, भरत गव्हाणे, प्रवीण उत्तम गव्हाणे , पोलीस मित्र खंडू चकोर यांनी नागरिकांना फोन करत काळजी घेण्याचे आवाहन करत सतर्क राहण्याचा इशारा दिला.

पोलीस मित्र खंडू चकोर यांनी तातडीने आनंद पार्क येथे माईक वर सूचना करत काळजी घेण्याचे आवाहन केले तसेच बरेच नागरिक टेरेस व वरच्या मजल्यावरील खिडक्यांमधून बॅटऱ्यांच्या ( टॉर्च मारून) प्रकाशात बिबट्या जवळपास कुठे आहे का हे शोधण्याचा प्रयत्न करत होते. तर अनेकांनी व्हॉट्स ॲप वर स्टेटस ठेवत नागरिकांना सतर्कतेचे आवाहन केले .

याबाबत वनविभाग वनरक्षक दहातोंडे हे कोरेगाव भिमा येथील सकाळी पकडलेला बिबट्या जुन्नरला उपचारासाठी दाखल केला असून रात्री आढळलेल्या बिबट्याला लवकरच जेरबंद करण्यासाठी पिंजरा लावू असे सांगितले.

शिरूर वन परिक्षेत्र अधिकारी प्रताप जगताप यांनी तातडीने पिंजरा लावून बिबट्याला जेरबंद करण्यासाठी प्रयत्न करू असे सांगितले. नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन वनविभाग, कोरेगाव भीमा ग्राम पंचायत यांच्या वतीने करण्यात आले आहे.

संबंधित लेख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!