कोरेगांव भीमा -वढू बुद्रुक ( ता.शिरूर) लोककल्याणकारी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या २९८ व्या जयंतीनिमित्त महिला व बालविकास क्षेत्रामध्ये तसेच सामाजिक क्षेत्रामध्ये योगदान देणाऱ्या महिला भगिनींना वढू बुद्रुक ग्राम पंचायतीच्या वतीने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्काराने वर्षा रामदास शिवले व सिमा अनिल भंडारे यांना सन्मानित करण्यात आले असल्याची माहिती सरपंच सारिका अंकुश शिवले यांनी दिली.
महिला व बालविकास क्षेत्रामध्ये ज्या महिलांनी उत्कृष्ट कामगिरी केलेली आहे. अशा प्रत्येक ग्रामपंचायत मध्ये दोन महिलांना महाराष्ट्र सरकारकडून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला सन्मान पुरस्कार देण्यासंदर्भात महाराष्ट्र शासनाने ९ मे २०२३ रोजी अधिकृत शासन निर्णय (GR ) निर्गमित करण्यात आला होता.
यानुसार वढू बुद्रुक ग्राम ग्राम पंचायतीच्या . पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार सन २०२३ – २०२४ सन्मानित वर्षा रामदास शिवले व सिमा अनिल भंडारे करण्यात आले.
यावेळी विद्यमान सरपंच सारिका अंकुश शिवले, माजी सरपंच अंकुश शिवले, उपसरपंच राहुल कुंभार,माजी उपसरपंच लालाशेठ तांबे, ग्रामपंचायत सदस्य माऊली भंडारे , कृष्णा आरगडे ,संगीता सावंत, अनिता भंडारे, वैभव भंडारे , ग्राम विकास अधिकारी शंकर भाकरे, सोसायटी संचालक बळीराम गायकवाड सर्व आशा वर्कर बचत गटातील महिला उपस्थित होते.