बस क्रेनच्या साहाय्याने घेतली बाजूला, चालकाचा पाय फॅक्चर , जखमींवर वाघोली व मुंबईत उपचार सुरू
पाथर्डी-मुंबई बस दुभाजकला धडकून सुमारे ११ प्रवासी जखमी झाले यामध्ये एस टी बस चालकाचा पाय फॅक्चर झाला असून आणखी एका प्रवाशाच्या डोळ्याला मार लागलं असून किरकोळ जखमी असणाऱ्या ९ प्रवाशांना घरी सोडण्यात आल्याची माहिती पोलीस निरीक्षक वरिष्ठ पोलीस निरीक्षक कैलास करे व सहाय्यक पोलीस निरीक्षक चेतन थोरबोले यांनी दिली.(Road Accident)
ही घटना शनिवारी मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास पुणे-नगर महामार्गावर पेरणे फाटा टोल नाक्याजवळ हॉटेल चंद्रमा जवळ घडली. पाथर्डी-मुंबई बसमध्ये एकूण ३८ प्रवासी होते.सदर बस पेरणे फाटा येथील टोल नाक्याजवळ हॉटेल चंद्रमा येथे आली असता अचानक सळई भरलेल्या ट्रकने अचानक ब्रेक मारल्याने पुढील अनर्थ टाळण्यासाठी एस टी चालकाचे नियंत्रण सुटल्यानेदुभाजकला धडकून सुमारे १० ते ११ प्रवासी जखमी झाले. यातील चालकाचे दोन्ही पाय अपघातात जखमी झाले असून एक पाय फॅक्चर आहे.
प्रवाशांवर वाघोली येथील खाजगी हॉस्पिटलमध्ये ८ जखमींवर उपचार सुरू असून एस टी चालक यांच्यावर मुंबई येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पाच ते सात प्रवासी किरकोळ जखमी झाले होते. ते उपचारानंतर घरी परतले.
मिळालेल्या माहितीनुसार, पाथर्डी-मुंबई बस क्रमांक एम एच १४ बी टी ३०९० ही नगर येथून निघाल्यानंतर सुपा येथे जेवणासाठी थांबली. तेथील थांबा घेतल्यानंतर बस पुण्याकडे निघाली. पेरणे फाटा येथे बसच्या पुढे लोखंडी सळ्या असलेला ट्रक होता. त्या ट्रकने अचानक ब्रेक मारल्याने त्या ट्रकची धडक वाचविण्यासाठी बस दुभाजकाला धडकली. अनेक प्रवासी झोपेत होते.
बस धडकल्याने अनेक प्रवाशांना पुढील सीटचा चेहऱ्याला मार लागला. काही प्रवासी सीटमध्ये अडकून पडले होते. मागील सीट पुढील सीटवर आदळले. त्यावेळी बसमध्ये सुमारे ३८ प्रवासी होते. घटना कळताच लोणीकंद पोलीस, वाहतूक विभागाचे कर्मचारी घटना स्थळी पोहचले. त्यांनी बसमधील जखमी प्रवाशांना रुग्णवाहिका बोलावून वाघोलीतील खासगी रुग्णालयात पाठविले. सीट खाली अडकलेल्या प्रवाशांची सुटका करून त्यांना रुग्णालयात पाठविले.
बसमधील सर्व प्रवाशांना उतरविल्यानंतर बस क्रेनच्या साह्याने बाजूला करून वाहतूक सुरळीत करण्यात आली. यामध्ये चालक गंभीर जखमी झाला. एसटी विभागाला माहिती कळाल्यानंतर एसटीचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी व रुग्णालयात पोहचले. त्यांनी रुग्णांना तातडीची मदत केली. वाघोली येथील खासगी रुग्णालयात ११ रुग्णांवर, वाघोली येथील रुग्णालयात रुग्णांवर तर एसटी चालक सतीश वारे यांच्यावर मुंबई येथे उपचार सुरू असून एक पाय फॅक्चर झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.
एकाच कुटुंबातील सहाजण जखमी – या अपघातात पाथर्डी येथील संदीप ज्ञानोबा सानप हे पत्नी दोन मुले व मेहुणीसह मुंबई येथे जाण्यासाठी प्रवास करीत होते. या अपघातात संदीप ज्ञानोबा सानप (वय ३८ ),कामिनी सानप (वय ३० ), वेदिता सानय (वय ८ ), वेदांत सानप (वय ३ ),रुपाली सानप (वय ३० )अंजीनी सानप (सर्व मूळ रा. पाथर्डी, नगर ) हे सर्व जण जखमी झाले. त्यांच्यावर वाघोलीतील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.