कोरेगाव भीमा – सणसवाडी ( ता.शिरूर) येथील माजी पुणे जिल्हा नियोजन समिती सदस्य पंडित दरेकर यांच्या वाढदिवसानिमित्त माहेर संस्थेत अन्नदान करण्यात येऊन सामाजिक बांधिलकी जपणायत्वाली आहे.
माजी पुणे जिल्हा नियोजन समिती सदस्य पंडित दरेकर यांच्या वाढदिवसानिमित्त सणसवाडी येथील माहेर संस्थेत अन्नदान करण्यात आले.यावेळी माहेर संस्थेच्या वतीने त्यांचे औक्षण व अभिष्टचिंतन करण्यात आले. वाढदिवसाचा केक कापण्यात आला तसेच उपस्थितांनी त्यांचे आभार मानत दीर्घायुष्याच्या शुभेच्छा दिल्या.
यावेळी सुभाष दरेकर ,अनिल गोटे व मित्र परिवार यांच्यावतीने हे स्नेहभोजन देण्यात आले.
माजी चेअरमन सुहास दरेकर, निलेश दरेकर, रामभाऊ दरेकर, प्रशांत दरेकर, बाळकृष्ण दरेकर, योगेश दरेकर व माहेर संस्थेमधील स्टाफ आणि मान्यवर उपस्थित होते