Tuesday, November 19, 2024
Homeअर्थकारणनेहरूनंतर तिसऱ्यांदा शपथ घेणारे एकमेव पंतप्रधान..मी नरेंद्र दामोदरदास मोदी, ईश्वरची शपथ घेतो...

नेहरूनंतर तिसऱ्यांदा शपथ घेणारे एकमेव पंतप्रधान..मी नरेंद्र दामोदरदास मोदी, ईश्वरची शपथ घेतो की…

‘मी नरेंद्र दामोदरदास मोदी, ईश्वरची शपथ घेतो की…’, असं म्हणत नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधानपदाची शपथ घेतली आहे. राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू (President Draupadi Murmu) यांनी नरेंद्र मोदी यांना पद आणि गोपनियतेची शपथ दिली.(Narendra Modi-Oath-Ceremony)

नरेंद्र मोदी यांच्यासह ७२ मंत्र्यांनी शपथ घेतली. पंतप्रधान मोदींच्या नव्या टीममध्ये ३० कॅबिनेट मंत्री, ५ मंत्री स्वतंत्र कारभार, ३६  राज्यमंत्री असणार आहेत. लोकसभा निवडणुकीच्या निकालमध्ये एनडीएला बहुमत मिळाल्यानंतर देशामध्ये तिसऱ्यांदा नरेंद्र मोदींच्या (Narendra Modi) नेतृत्वात एनडीएने सरकार स्थापन केलं आहे.(Narendra Modi 3.0)

स्वराज्य राष्ट्र
पंतप्रधान पदाची शपअथ देताना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु व पंतप्रधान पदाची शपथ घेताना पंतप्रधान नरेंद्र मोदी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यानंतर राजनाथ सिंग यांनी शपथ घेतली. तर त्यापाठोपाठ मोदींचे जवळचे सहकारी अमित शाह यांनी कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेतली. तर नितीन गडकरी यांनी देखील कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतलीये. यावेळी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे देखील मोदींच्या शपथविधी सोहळ्याला हजर होते. तसेच भारताचे सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड हे देखील शपथविधी सोहळ्याला उपस्थित होते.(NDA)

केंद्रिय मंत्रिमंडळाच्या शपथविधीला मालदीवचे अध्यक्ष मोहम्मद मुइज्जू, श्रीलंकेचे राष्ट्रपती रानिल विक्रमसिंघे, सेशेल्सचे उपराष्ट्रपती अहमद अफिफ, मॉरिशसचे पंतप्रधान प्रविंद कुमार जुगनाथ, बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना, नेपाळचे पंतप्रधान पुष्प कमल दहल ‘प्रचंड’ आणि भूतानचे पंतप्रधान शेरिंग तोबगे हे उपस्थित होते.(Amit shah)

दरम्यान, शपथ घेण्याआधी पंतप्रधान मोदी आज सकाळीच राजघाटावर पोहोचले आणि ते राष्ट्रपिता महात्मा गांधींच्या समाधीवर नतमस्तक झाले. त्यानंतर त्यांनी अटल बिहारी वाजपेयींच्या समाधीचं दर्शन घेतलं. तसंच वॉर मेमोरिलला भेट देऊन वीर जवानांना अभिवादन केलं होतं.(Naredra Modi)

महाराष्ट्रातील ‘या’ नेत्यांना मोदी सरकारमध्ये संधी

नितीन गडकरी – २०१४आणि २०१९ च्या दोन्ही मंत्रिमंडळात नितीन गडकरी सहभागी होते. रस्ते वाहतूक मंत्रालय त्यांच्याकडे होतं. या नव्या मंत्रिमंडळातही त्यांना संधी मिळाली आहे.

पीयूष गोयल – २०१४ आणि २०१९या दोन्ही मंत्रिमंडळात पीयूष गोयल केंद्रीय मंत्री होते. रेल्वे मंत्रालयासारखं मोठं मंत्रालय त्यांनी सांभाळलं आहे. मोदी सरकारच्या नव्या मंत्रिमंडळातही पियुष गोयल यांना संधी मिळाली आहे. यापूर्वी राज्यसभेतून संसदेत पोहोचणारे गोयल यंदा उत्तर मुंबई लोकसभा मतदारंसघातून विजयी होऊन संसदेत पोहोचले आहेत.

प्रतापराव जाधव – एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे बुलडाण्याचे खासदार प्रतापराव जाधव यांची मोदी सरकारमध्ये वर्णी लागली आहे. त्यांना कॅबिनेट मिळेल की राज्यमंत्रिपद हे अद्याप स्पष्ट नाही.

रक्षा खडसे – रावेरच्या खासदार रक्षा खडसे यांना मोदींच्या नव्या मंत्रिमंडळात संधी मिळाली आहे. रक्ष खडसे या माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांच्या सून आहे.

रामदास आठवले – रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) चे अध्यक्ष रामदास आठवले यांचीही नव्या मंत्रिमंडळात वर्णी लागली आहे. आठवले यापूर्वीच्या दोन्ही मोदी सरकारमध्ये राज्यमंत्री होते.

मुरलीधर मोहोळ – पुण्याचे पहिल्यांदाच खासदार बनलेले मुरलीधर मोहोळ यांनाही मोदींच्या मंत्रिमंडळात संधी मिळाली आहे. काँग्रेसच्या रवींद्र धंगेकर यांचा पराभव करून ते संसदेत पोहोचले आहेत.

संबंधित लेख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!