कोरेगाव भीमा – पेरणे ( ता.हवेली)
धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज पालखी सोहळा समितीची बैठक दिनांक २६ फेब्रुवारी रोजी मौजे पेरणे येथे सह्याद्री भवनवर संदीप भोंडवे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. या बैठकीमध्ये धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज पालखी सोहळ्याच्या नियोजनावर चर्चा झाली .
पालखी सोहळ्याचे हे ७ वे वर्ष असुन शंभुराजेची जन्मभूमी किल्ले पुरंदर ते बलिदान भुमी तुळापुर , समाधी स्थळ वढु बुद्रुक या दरम्यान हा पालखी सोहळा संपन्न होत असतो.या वर्षी हा पालखी सोहळा दीनांक २० व २१ मार्च रोजी संपन्न होणार असुन २० मार्च रोजी सकाळी ७.०० वाजता किल्ले पुरंदर वरुन पालखी सोहळ्याचे प्रस्थान होईल . नारायणपुर येथे नारायण महाराजांचे हस्ते पादुकांचे पुजन करुन पालखी वाघोली मुक्कामी येईल .नारायणपुर ते वाघोली हा प्रवास चारचाकी गाड्यांनी करण्यात येणार आहे .
दिनांक २१ मार्च रोजी सकाळी ८.३० वाजता वाघोलीमधुन पालखी सोहळ्याचे प्रस्थान होणार असुन दुपारी १२.०० वाजता बलिदान भूमी तुळापुर येथे समाधीस्थळी अभिषेक व आरती होईल व पालखी सोहळा वढु बुद्रुक च्या दिशेने मार्गस्थ होईल.
पालखी सोहळ्याच्या बैठकीस शामराव गावडे , ज्ञानेश्वर शिवले , विपुल शितोळे , शरद आव्हाळे , सचिन पलांडे , भाऊसाहेब शिंदे ,शिवाजी शिवले ,दशरथ वाळके , संतोष गायकवाड , संकेत जाधवराव, भाऊसाहेब चौधरी , श्री अतुल मोरे , राजेंद्र कंद , सुजित वाळके , नंदा जाधव तसेच पालखी सोहळ्यातील इतर सभासद उपस्थित होते.