Thursday, November 21, 2024
Homeताज्या बातम्यादिव्यांगांसाठी आनंदाची बातमी! दिव्यांगांना एसटीने आता मोफत प्रवास..

दिव्यांगांसाठी आनंदाची बातमी! दिव्यांगांना एसटीने आता मोफत प्रवास..

राज्य सरकारचा महत्वपूर्ण निर्णय

पुणे – राज्य परिवहन महामंडळातर्फे एका परिपत्रकाद्वारे दिव्यांगांना आता एसटी ने मोफत प्रवास करता येणार असल्याचे जाहीर केले आहे. या निर्णयाचे दिव्यांग बांधव व समितीद्वारे स्वागत करण्यात येत आहे.
७५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरीकांना मोफत एसटी प्रवास, महिलांना सरसकट अर्धे तिकीट हे दोन निर्णय शिंदे-फडणवीस सरकारने घेतले होते, त्यानंतर दिव्यांगांना देखील राज्यभर मोफत प्रवास करता येणार असल्याचा निर्णय घेण्यात आला आहे.(The State Transport Corporation through a circular has announced that disabled persons will now be able to travel by ST for free. This decision is being welcomed by the disabled brothers and the committee.
Two decisions were taken by the Shinde-Fadnavis government: free ST travel for senior citizens above 75 years, half ticket for women, after which it has been decided that disabled people can also travel for free across the state.)
(Good news for the disabled! Free travel for disabled people by ST now..)

राज्यातील मुंबई/ पालघर/ रायगड(पेण)/ रत्नागिरी/ सिंधुदूर्ग/ ठाणे/नाशिक/धुळे/ जळगांव/अहमदनगर/ पुणे/ कोल्हापूर/ सांगली/ सातारा / सोलापूर/ औरंगाबाद/ बीड/ जालना/ लातूर/ नांदेड / उस्मानाबाद/ परभणी/नागपूर/ भंडारा/चंद्रपूर/वर्धा/गडचिरोली/अकोला अमरावती/यवतमाळ / बुलढाणा विभागातील दिव्यांगांना याचा लाभ मिळणार आहे.(Mumbai / Palghar / Raigad (Pen) / Ratnagiri / Sindhudurg / Thane / Nashik / Dhule / Jalgaon / Ahmednagar / Pune / Kolhapur / Sangli / Satara / Solapur / Aurangabad / Beed / Jalna / Latur / Nanded / Osmanabad / Parbhani / Nagpur / Bhandara / Chandrapur / Wardha / Gadchiroli / Akola Amravati / Yavatmal / Buldhana Division Disabled people will get benefit from this.)

दिव्यांगत्वाचे वेगवेगळे प्रकार आहेत. त्यात काही प्रकारासाठी सातत्याने उपचार करावे लागतात. त्यामध्ये सिकलसेल, एचआयव्ही बाधित, डायलेसिस व हिमोफेलिया यासारख्या प्रकारांचा समावेश होतो. राज्यातील अशा रुग्णांना विविध आरोग्य सेवा आणि उपचारासाठी नियमितपणे जिल्हा रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय तसेय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये जावे लागते. त्यामुळे त्यांचा प्रवास खर्च वाढतो. याचा विचार करून या रुग्णांना मदतीचा हात मिळावा म्हणून राज्य शासनाने महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) बस मार्फत मोफत प्रवासाची योजना लागू केली आहे.
(Good news for the disabled! Free travel for disabled people by ST now..)

 या निर्णयामुळे दिव्यांग बांधवांना मोठ्या प्रमाणावर लाभ होणार असून रुग्णांना उपचार घेण्यासाठी याचा लाभ होणार आहे.तसेच मोठ्या प्रमाणावर प्रवास खर्च वाचल्याने त्यांना आर्थिक फायदा होणार आहे.

एसटी महामंडळाच्या बसने सिकलसेल, एचआयव्ही बाधित, डायलेसिस आणि हिमोफेलिया या रुग्णांना आता मोफत प्रवास करण्याची परवानगी देण्यात आली आहे. या राज्य शासनाच्या निर्णयामुळे रुग्णांना (दिव्यांग) विनामूल्य प्रवास सवलत मिळाल्यामुळे त्यांचा प्रवास खर्च वाचणार आहे, त्यामुळे या रुग्णांना मोलाची मदत होणार आहे. यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाने परिवहन मंडळाचे आभार मानले आहेत.(Good news for the disabled! Free travel for disabled people by ST now..)

संबंधित लेख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!