पाच हजार पणत्यांनी उजळला समाधी परिसर , आकर्षक फटाकड्यांची आतषबाजी,आकर्षक विद्युत रोषणाई,बालिकेने सादर केला पोवाडा तर रांगोळीत साकारले राम मंदिर
कोरेगाव भिमा – श्री क्षेत्र वढू बुद्रुक (ता.शिरूर) येथे श्री धर्मवीर संभाजी महाराज समाधी स्थळ व परिसरात त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त पाच पणत्या लावत आकर्षक विद्युत रोषणाई करत फटकड्यांची आतषबाजी करण्यात येऊन त्रिपुरारी पौर्णिमेचा दीपोस्तव मोठ्या जल्लोषात व आनंदाच्या वातावरणात सहारा करण्यात आला.
श्री क्षेत्र वढू बुद्रुक (ता.शिरूर) येथे. स्वराज्यरक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज समाधी व छंदोगामात्य कवी कलश समाधी व परिसरात पाच हजार दिव्यांची रोषणाई व छञपती संभाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात येऊन फटकड्यांची आतषबाजी करण्यात आली.यावेळी आकर्षक रांगोळी मध्ये श्री राम मंदिर रेखाटण्यात आले होते
श्री धर्मवीर संभाजीराजे युवा मंच व स्मृती समिती आणि ग्रामस्थ यांच्या आकर्षक अश्या रांगोळीमधे राम मंदिर साकारून आकर्षक सजावट करण्यात आली यावेळी एका लहानशा चिमुकलीने पोवाडा सादर केला ध्येयमंत्र घेऊन कार्यक्रमाची सुरुवात आणि प्रेरणा मंत्र घेऊन कार्यक्रमाचे सांगता करण्यात आले .
युवा मंच अध्यक्ष अनिल भंडारे, समितीचे अध्यक्ष सोमनाथ भंडारे स्मृती आणि मंडळाचे सर्व कार्यकर्ते गावातील महिला मंडळी आणि समस्त ग्रामस्थ वढू बुद्रुक उपस्थित होते.