Monday, October 14, 2024
Homeताज्या बातम्याडॉ अमोल कोल्हे यांच्या विजयाची कोरेगाव भीमा येथे गुलालाची उधळण करत शिरूरमध्ये...

डॉ अमोल कोल्हे यांच्या विजयाची कोरेगाव भीमा येथे गुलालाची उधळण करत शिरूरमध्ये फुंकली पहिली विजयाची तुतारी…

फटाकड्यांची आतषबाजी ढोल ताशा,तुतारी फुंकत पेढे भरवत घोषणा दिली..रामकृष्ण हरी… वाजली तुतारी

कोरेगाव भिमा (ता.शिरूर) देशासह राज्यात लक्षवेधी असलेल्या शिरूर लोकसभा मतदार संघात अत्यंत चुरशीच्या लढतीमध्ये डॉ अमोल कोल्हे  बहुमताने विजयी झाल्याने  शिरूर तालुक्यातील कोरेगाव भिमा येथील कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण व फटाकड्यांची आतषबाजी करत ढोल, ताशाच्या गजरात शिरूर तालुक्यात विजयाची पहिली विजयी तुतारी फुंकत विजयोस्तव साजरा करण्यात आला.(Shirur Loksabha)

 शिरूर लोकसभेचे खासदार डॉ अमोल कोल्हे यांच्या विजयाचा आनंद कोरेगाव भिमा येथील वढु बुद्रुक चौकात फटाकड्यांची आतषबाजी करत गुलालाची उधाण करत ढोल,ताशा व तुतारी च्या गजरात रामकृष्ण हरी..वाजली तुतारी.. अशा घोषणा देत माजी केंद्रीय मंत्री व पक्षाध्यक्ष शरद पवार व डॉ अमोल कोल्हे यांच्या नावाच्या व रामकृष्ण हरी..वाजली तुतारी.. अशा घोषणा देत एकमेकांना पेढे भरवले. (Dr Amol kolhe)

यावेळी कोरेगाव भीमाचे सरपंच संदीप ढेरंगे, माजी पंचायत समिती सदस्य पि के (आण्णा) गव्हाणे, माजी उपसरपंच राजेंद्र ढेरंगे, ग्राम पंचायत सदस्य महेश ढेरंगे, शरद ढेरंगे, वंदना गव्हाणे, संचालक अशोक गव्हाणे, माजी ग्राम पंचायत सदस्य सुरेंद्र भांडवलकर, कुंदा फडतरे, मीना ढेरंगे, माजी चेअरमन बबुशा ढेरंगे, हॉटेल गणेश भुवनचे महादेव फडतरे, सुनील.गव्हाणे, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाचे दत्तात्रय वारघडे, कौस्तुभ होळकर, उद्योजक शांताराम फडतरे, राहुल ढेरंगे, नितीन गव्हाणे,  महादेव फडतरे, मधुकर गव्हाणे, ज्ञानेश्वर फडतरे, संदीप फडतरे,दिलीप फडतरे,दीपक फडतरे, प्रदिप खलसे राजेंद्र गव्हाणे ,धीरज परदेशी, योगेश मांझिरे व इतर मान्यवर उपस्थित होते.

संबंधित लेख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!