कोरेगाव भीमा – डिंग्रजवाडी (ता. शिरूर) येथे सन २०००-२००१ या वर्षातील विद्यार्थी व विद्यार्थिनींचा वर्ग भरला यावेळी उपस्थित शिक्षकांचा फेटा बांधून सत्कार करण्यात आला यावेळी शिक्षकांनी जीवनाला आकार देत आकाशात झेप घेण्यासाठी पंखात बळ, मनात आत्मविश्वास तर विचारांना कृतिशिलता आणि अध्यात्म आणि विज्ञान यांची सांगड घालत माणुसकीचे व मानवतेचे भान बाळगण्याचे बाळकडू दिले याबद्दल गुरुजींच्या पायावर डोके ठेवत कृतज्ञता व्यक्त करत शाळेचे सदैव ऋणी आहोत अशी भावना व्यक्त करत माजी विद्यार्थी व विद्यार्थिनींचा स्नेहमेळावा अत्यंत उत्साहाच्या व आनंदाच्या वातावरणात पार पडला.
डिंग्रजवाडी येथील जिल्हा परिषद शाळेतील सन २००० – २००१या वर्षातील सातवीच्या वर्गातील माजी विद्यार्थी वविद्यार्थिनींचा स्नेहमेळाव्याचे आयोजन करण्यात आलेहोते. यावेळी उपस्थित शिक्षक, विद्यार्थी व विद्यार्थिनींनाआकर्षक फेटा बांधण्यात येऊन स्मृतिचिन्ह देण्यात आले. यावेळी विद्यार्थी व विद्यार्थिनींनी गुरुजन व शाळा यांचे आभार मानत आपल्या जीवनातली यशस्वी वाटचाल सुरू असण्यामागे यांचा मोलाचा वाटा असल्याचे सांगत कृतज्ञता व्यक्त केली. यावेळी उपस्थित सर्वांना शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह व गुलाब पुष्प देवून सन्मानित करण्यात आले.
यावेळी गुरुवर्य मुख्याध्यापक गोकुळे गुरुजी , गट शिक्षणाधिकारी व गटविस्तार अधिकारी मावळ तालुका वाळुंज गुरुजी , कुताळ गुरूजी यांनी विद्यार्थी व विद्यार्थिनींच्या कर्तृत्वाचे कौतुक करत या गुणी विद्यार्थ्यांना ज्ञानदान केल्याचा अभिमान व गर्व वाटत असल्याचे मत व्यक्त केले. यावेळी सर्व विद्यार्थी व विद्यार्थिनींनी मनोगत व्यक्त करत शाळेतील स्मृतींना उजाळा दिला. कोणी भावूक झाले तर कोणी आपल्या आयुष्यातील संघर्ष मांडत इतरांना प्रेरणा दिली पण सगळ्यांनी शाळा व शिक्षक यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त केली.कार्यक्रमानंतर स्नेहभोजन समारंभ पार पडला.
कार्यक्रमाचे नियोजन व सूत्रसंचालन समिर गव्हाणे सर , प्रताप फडतरे सर , रविन्द्र गव्हाणे यांनी केले तर यांनी केले. आभार – साईनाथ गव्हाणे यांनी केले. यावेळी ग्राम पंचायत सदस्य रुपाली वाडेकर,उमा मासळकर , सीमा इंगवले, शारदा साकोरे,सुरेखा गवारे,सारिका नळकांडे,उषा हरगुडे, अर्चना सासवडे, मारुती गव्हाणे , शुभांगी गाडेकर ,भगवान सोनवणे ,उद्योजक कानिफ गव्हाणे, विशाल गव्हाणे , गणेश गव्हाणे, विवेक मगर विद्यार्थी होते.