व्हिडीओ समोर आल्याने खळबळ
सिनियर कडूनच भर पावसात विद्यार्थ्यांना एन सी सी च्या प्रशिक्षणाच्या दरम्यान अमानुषपणे मारहाण
पुणे –
ठाण्यातील जोशी बेडेकर कॉलेजातील NCC च्या विद्यार्थ्यांना भर पावसात अमानवी शिक्षा व्हिडीओ समोर आल्याने खळबळ उडाली असून धक्कादायक व्हिडीओ व्हायरल होत आहे. बांदोडकर आणि जोशी बेडेकर महाविद्यालयात एनसीसीच्या विद्यार्थ्यांना बेदम मारहाण होत असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
त्यामुळे विद्यार्थी , पालक यांच्यासह विविध क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे. यात एनसीसीचे हेड विद्यार्थ्यांना अमानुष माराहाण करताना दिसत आहे. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये एनसीसीबाबत दहशत पसरली आहे.
जोशी बेडेकर कॉलेजच्या प्रांगणात बांदोडकर, बेडेकर आणि पॉलिटेक्निक या तिन्ही विभागांच्या विद्यार्थ्यांना संयुक्त असे एनसीसीचे प्रशिक्षण देण्यात येते. या प्रशिक्षणदरम्यान विद्यार्थ्यांना आर्मी आणि नेव्हीच्या प्रशिक्षणा पूर्वीचे धडे देण्यात येतात. याच दरम्यान विद्यार्थ्यांकडून एखादी चूक झाल्यास त्यांना शिक्षाही करण्यात येत असते.
मात्र, ही शिक्षा अशा अमानवी व क्रूर प्रकारची असल्याचं समोर आल्याने खळबळ उडाली आहे. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये एनसीसीबाबत दहशत पसरली आहे. मात्र, या विद्यार्थ्यांनी अजिबात काळजी करू नये हे असले प्रकार आम्ही कोणीही खपवून घेणार नसल्याचे जोशी बेडेकर कॉलेजच्या प्राचार्या सुचित्रा नाईक यांनी खडसावून सांगितलं आहे
एनसीसीचे हेड हे सिनियर विद्यार्थीच असतात ते कोणी शिक्षक नसतात. मात्र, हा अत्यंत घृणास्पद असा प्रकार झाला आहे. याने एनसीसीच्या मार्फत जी चांगली काम होतात ती झाकोळली गेली आहेत. शिक्षक नसताना झालेला हा प्रकार असून त्या विद्यार्थ्यावर तात्काळ कारवाई करण्याची प्रक्रियाही सुरू करण्यात आलेली आहे. त्याचबरोबर हे असले प्रकार यापुढे होऊ नयेत म्हणून एक कमिटीची स्थापनाही आम्ही तत्काळ करण्यात येणार असून ज्या कोणा विद्यार्थ्यांबाबत असे प्रकार घडले असतील त्यांनी अजिबात घाबरून जाऊ नये आम्हाला येऊन भेटावे. एनसीसी सोडण्याचा विचार अजिबात करु नये, असे सुचित्रा नाईक यांनी सांगितले आहे.