टोरेंटो गॅस कंपनीच्या विरोधात पेरणे फाटा येथे रास्ता रोको आंदोलन
कोरेगाव भीमा – पेरणे फाटा (ता.हवेली) येथे देशामध्ये संवेदनशील असलेल्या जयस्तंभ येथून जाणाऱ्या टोरेंटो गॅस कंपनीच्या गॅस पाईप लाईन विरोधात माजी खासदार व नेते प्रा.जोगेंद्र कवाडे यांचे चिरंजीव जयदेव कवाडे व लता शिरसाठ यांनी रस्ता रोको आंदोलन करत काम बंद पाडले असून याबाबत पोलीस प्रशासन व बांधकाम विभाग यांच्या कामकाजविषयी संशय व्यक्त करत रोष व्यक्त करण्यात आला.
टोरंट गॅस कंपनीनंए सर्व शासकीय परवानग्या घेतल्या असल्याबाबत वेळोवेळी सांगितले असून गॅस पाईप लाईन बाबत स्थानिकांना विश्वासात घेण्याची आवशक्यता वाटत असून याबाबत कंपनीने सुरक्षात्मक उपाययोजना, आधुनिक तंत्रज्ञान , मदत केंद्र, याबाबत माहिती दिल्यास नागरिकांच्या मनातील शंका निरसन होईल.
टोरेंटो गॅस कंपनीच्या पाईप लाईन खोदकामास ग्रामस्थांचा विरोध होत असताना प्रशासन मात्र याकडे अर्थपूर्ण दुर्लक्ष करताना दिसत आहे. याबाबत पुणे जिल्हाधिकारी कार्यालय, बांधकाम विभाग यांना लता शिरसाठ यांनी निवेदन देऊनही साधे उत्तर देण्यास बांधकाम विभाग व जिल्हाधिकारी कार्यालयास वेळ नाही याबाबत रोष व्यक्त करत रस्ता रोको आंदोलन करत डॉ बाबासाहेब आंबेडकर व जय भीम अशा घोषणांनी जयस्तंभ परिसर दणाणून सोडण्यात आला. यावेळी प्रशासनातील अधिकारी सहकार्य करत नसून त्यांचे काही हितसंबंध आहेत का ? त्यांना लोकांच्या जिवापेक्षा गॅस पाईप लाईन महत्वाची असून दलितांच्या अस्मितेशी व जिविताशी खेळण्याचा जाणून बुजून प्रयत्न करण्यात येत असल्याचे लता शिरसाठ यांनी सांगितले.
वेळ प्रसंगी आमरण उपोषण करत प्राण त्याग करू – लता शिरसाठ यांनी प्रशासनाच्या कारभाराविषयी लवकरच आमरण उपोषण करण्यात येणार असून प्रशासनातील एक अधिकारी आमच्यावर गुन्हे दाखल करू अशी धमकी देत असून त्यांच्या दबावाला आम्ही बळी पडणार नसून वेळ प्रसंगी आमरण उपोषणाच्या माध्यमातून प्राण त्याग करण्याची वेळ आली तरी चालेल पण सदर गॅस पाईप पासून कोरेगाव भिमा येथील ऐतिहासिक पुलास कोणताही धोका, नसल्याचे हमीपत्र द्यावे,व निवेदनातून इतर सुरक्षिततेच्या प्रश्नांचा विचार करावा त्यांची उत्तरे द्यावी व जय स्तंभ परिसरात १ जानेवारी रोजी लाखोंच्या संख्येने भीम सैनिक येत असतात यावेळी काही दुर्घटना होऊ नये तसेच ऐतिहासिक जय स्तंभास काही होऊ नये ही आमची भूमिका असून प्रशासनातील बांधकाम विभागाचे अधिकारी जाणून बुजून भीम सैनिकांच्या अस्मितेशी खेळण्याचा प्रयत्न करत आहेत व आपल्या पदाचा गैरवापर करतात काय असा संशय येत आहे.यामुळे त्यांच्यावर कार्यवाही करण्यात यावी यासाठी आंदोलन करण्याची वेळ येऊ नये असा इशारा यावेळी उपस्थितांनी दिला.
टोरांटो गॅस कंपनीला नोटीस बजावण्यात येणार असून संबधित काम जानेवारी पर्यंत थांबवण्याचे आदेश देण्यात येणार आहेत.कोरेगाव भीमा ऐतिहासिक पुलास व जय स्तंभास कोणताही धोका नसल्याचे काही दुर्घटना झाल्यास त्यास बांधकाम विभाग जबाबदार राहणार असल्याचे हमीपत्र देणार असल्याची माहिती बांधकाम विभागाचे राहुल कदम यांनी दिली असून लेखी आदेश देण्यास मात्र दहा दिवसांपेक्षा जास्त कालावधी लागला आहे.
बांधकाम विभागाचे संशयास्पद काम – बांधकाम विभागाचे उपअभियंता राहुल कदम हे खोदकाम थांबण्यास सांगितले असल्याचे तोंडी सांगतात पण लेखी आदेश मात्र देत नाही आणि याबाबत संबधित लता शिरसाठ यांचा अर्ज प्राप्त होऊनही शासकीय कामकाज संहितेच्या नियमावली नुसार विहित कालावधीत उत्तर देत नाहीत संबधित बाबतीत त्यांना रस्ता रोको करावे लागते तर दुसरीकडे राजरोसपणे टोरांटो गॅस कंपनीचे खोदकाम सुरू आहे यामुळे बांधकाम विभाग व सदर गॅस कंपनी यांचे नेक्की चालले तरी काय ? १ जानेवारी मानवंदना कार्यक्रम व भीमसैनिक यांच्या अस्मितेशी खेळण्याचा जाणून बुजून प्रयत्न करणार येत आहे काय असा प्रश्न लता शिरसाठ यांनी उपस्थित केला आहे.
याबाबत बांधकाम विभागाचे कामकाज अर्थपूर्ण संस्थायस्पद असल्याची नाराजी उपस्थित जयदीप कवाडे, लता शिरसाठ व भीमसैनिक यांनी व्यक्त करत घोषणबाजी केली. यावेळी जयदीप कवाडे, लता शिरसाठ व इतर बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.