Saturday, September 7, 2024
Homeसाहित्य/सामाजिकचला व्यक्त होऊ या?जगातील प्रेरणादायी मनुष्यात माहेर संस्थेच्या संस्थापिका सि.लुसी कुरियन यांची ३० व्या स्थानी...

जगातील प्रेरणादायी मनुष्यात माहेर संस्थेच्या संस्थापिका सि.लुसी कुरियन यांची ३० व्या स्थानी निवड

अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन, ओर्फ़ विनफ्र, मलाला युसूफझई जगप्रसिद्ध व्यक्ती मध्ये माहेरच्या लुसी कुरियन यांचा समावेश

कोरेगाव भिमा – वढु बुद्रुक ( ता.शिरूर) येथील  समाजसेविका व माहेर संथेच्या संस्थापिका सिस्टर लुसी कुरियन यांच्या कार्याची दखल जागतिक स्तरावर घेण्यात आली त्यांचा अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन, ओर्फ़ विनफ्र, मलाला युसूफझई जगप्रसिद्ध व्यक्ती मध्ये माहेरच्या लुसी कुरियन यांचा समावेश करण्यात आला असल्याने आता वढू बुद्रुक गावाचे व माहेर संस्थेचे नाव जागतिक स्तरावर विक्रमी नोंदविण्यात आले असून 000M 100 या जर्मन मासिकाने जगातील सर्वात प्रेरणादायी मनुष्यात  2024 च्या निवडी  मध्ये माहेर संस्थेच्या संस्थापिका सि.लुसी कुरियन यांची ३० व्या स्थानी निवड झाली आहे. 

  जर्मनी मधील जागतिक कीर्तीचे मासिक असलेल्या 000M १०० मध्ये भारतातील सि. लुसी कुरियन यांच्या सह गांधीवादी कार्यकर्ते निपुण शहा यांची निवड तर आंतरराष्टीय पातळीवर मिशेल ओबमा, आर्नोल्ड श्वझनेगर, अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन, ओर्फ़ विनफ्र, मलाला युसूफझई जगप्रसिद्ध व्यक्ती मध्ये निवड झाली. 

मासिकाने म्हटल्या प्रमाणे सध्याचे जग हे उलटे क्रमानुसार  चालू आहे का असा प्रश्न पडतो कारण याला कारणे ही तशीच आहेत. यामध्ये इस्रायल आणि युक्रेनमधील युद्धे अविश्वासाने पाहतो, कृत्रिम बुद्धिमत्तेच्या जोखमींबद्दल काळजी करतो, राजकारण आणि अब्जावधी दिवाळखोरी पाहून आश्चर्यचकित होतो.पण यासोबत सौंदर्य, कला, संगीत, सामाजिक जीवन, जीवनाचा आनंद सह अनेक बाबीचा विचार करुन गेल्या ८ वर्षा पासून  आव्हानात्मक काळात ज्या लोकांनी  सर्वात जास्त प्रेरणा दिली, प्रेरित केले, आनंदित केले आणि उत्साहित केले आहे याची  OOOM मासिकाने आठव्यांदा मोठा रँकिंग “OOOM 100 यांनी लोकांची निवड यादी तयार केली आहे.

सिस्टर लुसी कुरियन यांनी समाजातील अनाथ,निराधार मुले,महिला व पुरुषाचे पुर्नवसनाचे काम गेल्या २७ वर्षा पासून करित आहे.आज भारतातील ७ राज्यात तर महाराष्ट्रातील ६ जिल्यात तर पुणे जिल्यातील ८ ठिकाणी संस्था विविध प्रकल्पाच्या माध्यमातून समाज विकासाचे कार्य सि.लुसी कुरियन यांच्या मार्गदर्शना खाली चालू आहे.त्यांच्या सामाजिक कार्याचा सन्मान म्हणून विविध स्तरातून त्यांना वेगवेगळी पुरस्कार मिळाले आहे.  सदर मासिक हे गेल्या काही वर्षांपासून सि.लुसी कुरियन यांना वेगवेगळी मानांकन देत आहे. 

यामुळे सध्या माहेर परिवारात खुप उत्साहाचे वातावरण असून बालगोपाल, महिला, पुरुष तसेच कर्मचारीवृंद यांच्या चेहऱ्या आंनद ओसंडून वाहत आहे.

संबंधित लेख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!