कोरेगाव भीमा ग्राम पंचायत ,पोलीस प्रशासन, एम एस सी बी, व स्थानिक मंडळाच्या उत्कृष्ट नियोजन व सहकार्याने रात्री बाराच्या आत सर्व मंडळांच्या श्रींचे विसर्जन शांततेत संपन्न
कोरेगाव भीमा – कोरेगाव भीमा (ता.शिरूर) येथील सार्वजनिक गणेशोस्तव मंडळांची मिरवणूक मोठ्या उत्साहाच्या व शांततेच्या वातावरणात पार पडली.यावेळी कोरेगाव भिमा ग्राम पंचायतीच्या वतीने गणेश मंडळांचे शाल,श्रीफळ व स्मृति चिन्ह देऊन स्वागत करण्यात आले. ग्राम पंचायतीच्या सरपंच विक्रम गव्हाणे,उपसरपंच गणेश कांबळे यांच्यासह सर्व पदाधिकारी व ग्रामसेवक रतन दवणे यांनी व्यवस्था केली होती.
यावेळी सार्वजनिक गणेशोस्तव मंडळाच्या समोर मोठ्या प्रमाणात डिजे व आकर्षक विद्युत रोषणाई,देखावा, महाराष्ट्राची सांस्कृतिक लोककला लावणी नृत्य सादर करण्यात आले तर पोलीस प्रशासन व विद्युत महा पारेषण यांच्या अचूक नियोजनाने रात्री साडे अकराच्या सुमारास सर्व मंडळांच्या श्रींच्या मूर्तीचे विसर्जन करण्यात आले होते.
कोरेगाव भीमा येथील नेहमीच चर्चेत असणारे व सामाजिक उपक्रम राबवणारे वक्रतुंड मित्र मंडळाने सकाळी पारंपरिक पद्धतीचा अवलंब करत मंडळाच्या सभासदांनी सकाळी साडे अकराच्या सुमारास गणपती बाप्पा मोरया चा जयघोष करत , परमापरिक वेशभूषा करत श्रींचे विसर्जन करत अभिनव उपक्रम राबवला.समाजाला उपयोगी पडतील व दिशा देतील असे उपक्रम राबवण्यासाठी मंडळ प्रयत्न करणार असल्याचे माजी उपसरपंच नितीन गव्हाणे, ग्राम पंचायत सदस्य अनिकेत गव्हाणे व मंडळांच्या सभासदांनी सांगितले.
यावेळी सार्वजनिक मित्र मंडळांनीही ढोल ताशा पथक, डिजे,लेझर हे मोठ्या प्रमाणावर आणले होते.
यावेळी कोरेगाव भिमा येथील अखिल ढेरंगे वस्ती जनसेवा तरुण मंडळ, जय हनुमान प्रतिष्ठान ,जय महाराष्ट्र, नरेश्वर तरुण मंडळ,जय हनुमान मित्र मंडळ, नवनाथ तरुण मित्र मंडळ , होळकर वाडा, अचानक तरुण मंडळ, अष्टविनायक तरुण मंडळ, सुवर्णयुग तरूण मंडळ, आदर्श प्रतिष्ठान मंडळ, संगम तरुण मंडळ, दोस्ती तरुण मंडळ व गजानन तरुण मंडळ, युवाशक्ती तरुण मंडळ, शिवसेना मित्र मंडळ, संत रोहिदास मित्र मंडळ यांनि तर चतुर्थीच्या दिवशी शिवशंभो प्रतिष्ठान खैरमोडे नगर, वाघेश्वर प्रतिष्ठान, शिवतेज मित्र मंडळ ,५०० बॉईज कोरेगाव भीमा मित्र मंडळ व इतर सार्वजनिक गणेशोस्तव मंडळांनी गणेश विसर्जन उत्साहाच्या वातावरणात शांततेत पार पाडले.
यावेळी पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर, सहाय्यक पोलीस निरीक्षक सतीश पवार, उपनिरीक्षक अविनाश थोरात, रज्जाक शेख, महिला पोलिस उपनिरीक्षक माधुरी झेंडगे, अनिता काळे व इतर ५५ पोलीस कर्मचारी , एम एस सी बी विभागाचे सहाय्यक अभियंता बाळासाहेब टेंगळे, तंत्रज्ञ पांडुरंग बगाटे ,पवन नीलंगे, पोलीस पाटील मालन गव्हाणे, ग्राम पंचायत कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेत उत्सव पार पाडण्यात मोलाची भूमिका बजावली.