श्रीराम जयंती जन्मोत्सवा निमित्त साध्वी वैष्णवी दीदी यांच्या भागवत कथेचे आयोजन
कोरेगाव भिमा – कोरेगाव भिमा (ता.शिरूर) येथे श्री रामनवमी जन्मोत्सव मोठ्या उत्साहाच्या वातावरणात स्त्री व पुरुषांनी पारंपरिक वेश परिधान करत ११२ जोडप्यांनी प्रभू श्रीरामांचा महायज्ञ केला असून कोरेगाव भिमा परिसरातील वातावरण भक्तिमय झाले होते तर गणेश भवाळकर यांच्या येथे दुपारी १२ला भजन करत जयघोषात प्रभू श्रीरामांचा जन्मोत्सव मोठ्या भक्तिमय वातावरणात पार पडला.
कोरेगाव भिमा येथील श्रीराम नवमी उत्सव समितीच्या वतीने भव्यदिव्य अशा महायज्ञाचे आयोजन केले होते यावेळी कोरेगाव भिमातील हनुमान मंदिर बाजार मैदान पूर्ण भरून गेले होते. भाविकांनी उदंड प्रतिसाद दिला. स्री पुरुषांनी पारंपरिक वेश परिधान करत प्रभू श्रीरामांचा जन्मोत्सव साजरा केला.या यज्ञाचे पौरोहित्य श्रीनिवास काका जोशी व श्रीपती काका जोशी यांनी केले.
गणेश भवाळकर यांच्या घरी पारंपरिक रित्या श्रीराम जन्मोत्सव साजरा करण्यात आला यावेळी प्रभू श्रीराम यांच्या मंदिराला आकर्षक फुलांची अल्क्षवेधी सजावट करण्यात आली होती. माऊली भजनी मंडळ, सिद्धेश्वर भजनी मंडळ व श्री गुरुदत्त महिला भजन मंडळाने भजन सेवा केली तरअहीला भगिनींनी पाळणा गात दुपारी १२ ला श्रीराम जन्माचे सुंटोडा वाटत स्वागत केले
भव्यदिव्य अशा भागवत कथेचे आयोजन – ह.भ.प भागवताचार्य साध्वी वैष्णवी दीदी सरस्वती यांच्या सात दिवसीय भागवत कथेचे आयोजन करण्यात आले आहे.पंचक्रोशीतील हजारो भाविक भक्त यावेळी उपस्थित राहणार असून भव्य दिव्य असे व्यासपीठ ,सुंदर सजावट तसच प्रभू श्रीराम यांची आकर्षक मूर्ती, भगवान श्रीकृष्ण – राधा यांची चित्तवेधक मूर्ती तसेच मोर यांची मूर्ती असून भाविक भक्तांसाठी रेड कार्पेट अंथरले असून झाडांना आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे तर पुणे नगर महामार्गावर विजेच्या खांबांना जय श्री ,श्री राम नवमी अशा भगव्या कापडी पट्ट्या लावल्याने कोरेगाव भीमाचे वातावरण प्रभू श्रीराम यांचे भक्तिमय झाले असून या भागवत सप्ताहाचे आयोजन तरुणाई कडून मोठ्या उत्साहाच्या वातावरणात करण्यात आले आहे.