कोरेगाव भीमा – केंदूरचा ऐतिहासिक वारसा जोपासताना शैक्षणिक गुणवत्ता वाढवणार असल्याचे प्रतिपादन स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था संचलित सरदार रघुनाथराव ढवळे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय केंदूर येथे ग्रामस्थांच्या वतीने आयोजित सत्काराला उत्तर देताना प्राचार्य अनिल साकोरे यांनी केले .त्यांची नुकतीच सरदार रघुनाथराव ढवळे हायस्कूल माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय केंदूर येथे प्राचार्य पदी निवड झाली. शैक्षणिक गुणवत्ते बरोबरच शालेय जीवनापासून विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांची आवड लागावी व क्रीडा क्षेत्रातील अनेक स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांनी सहभाग घ्यावा यासाठी ग्रामस्थांच्या व ग्रामपंचायत तसेच गावात उपलब्ध असलेल्या साधन व्यक्तींच्या मदतीने विशेष प्रयत्न करणार असल्याचे देखील त्यांनी सांगितले. स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे विभागीय सदस्य माजी सभापती सदाशिव थिटे, राम साकोरे यांनी संस्थेच्या माध्यमातून जी जी मदत लागेल ती देण्याचे आश्वासन उपस्थितांना दिले.
कार्यक्रमाला केंदूर नगरीचे प्रथम नागरिक सरपंच अविनाश साकोरे, फुलगावच्या सरपंच मंदाकिनी साकोरे, उद्योजक प्रमोद प-हाड, उद्योजक सतीश थिटे ,पोलीस पाटील सुभाष साकोरे ,शाहूराज थिटे, महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे उपाध्यक्ष जितेंद्रकुमार थिटे ,माजी सरपंच सुवर्णा थिटे , पिंपळे सौदागरचे उद्योगपती तानाजी काटे, पत्रकार श्रीहरी प-हाड,बँक ऑफ महाराष्ट्र चे मॅनेजर काळूराम तापकीर, चेतन तापकीर, अक्षय काटे,विश्वासनाना प-हाड ,माऊली थिटे, भाऊसाहेब थिटे ,गुलाबराव थिटे,भरत साकोरे , बाळासाहेब साकोरे,माजी सरपंच भानुदास साकोरे, अशोक भोसूरे,बन्सी प-हाड, आर डी गवळी. ,अरुण साकोरे, राहुल डुकरे, शहाजी सुक्रे, गणेश थिटे उपस्थित होते .कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पिचड सर यांनी तर आभार चंद्रकांत थिटे यांनी मांडले.