Tuesday, November 19, 2024
Homeसाहित्य/सामाजिकचला व्यक्त होऊ या?कुणबी दाखला काढायचाय मग ही आहेत महत्वाची आवश्यक १३ कागदपत्रे...!

कुणबी दाखला काढायचाय मग ही आहेत महत्वाची आवश्यक १३ कागदपत्रे…!

पुणे जिल्ह्यातील कुणबी नोंदी शोधण्याचे काम युद्धपातळीवर करा – जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख

पुणे – मराठा समाजातील व्यक्तींना मराठा-कुणबी, कुणबी-मराठा जातीचे प्रमाणपत्र देण्यासाठी आवश्यक पुरावे शोधले जाणार आहेत. कुणबी असल्याचा दाखला देण्यासाठी तेरा कागदपत्रांची तपासणी केली जाणार आहे.(Maratha Reservation)जिल्ह्यातील कुणबी नोंदी शोधण्याचे काम युद्धपातळीवर करा, असे आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिले आहेत.

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत डॉ. देशमुख बोलत होते. या वेळी जिल्हा पोलिस अधीक्षक अंकीत गोयल, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश चव्हाण, निवासी जिल्हा उपाधिकारी ज्योती कदम तसेच महानगरपालिका, सहकार विभाग, पुरातत्व विभाग आदी विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

दाखल्यासंदर्भातील बहुतेक नोंदी मोडी लिपीत असल्याने त्या तपासण्यासाठी पुराभिलेख संचालनालयाकडून प्रशिक्षित व्यक्तींचे सहकार्य घेण्यात यावे, प्रमाणपत्र देताना अशा व्यक्तीचे प्रमाणपत्र लक्षात घेतले जाते.१३ प्रकारच्या विविध कागदपत्रांच्या आधारे ही तपासणी करावयाची आहे. तपासलेल्या नोंदींची माहिती संकेतस्थळावर टाकून न्या. शिंदे समितीलाही पाठवायची आहे. त्यामुळे संबंधित विभागांनी या कामासाठी पूर्णवेळ अधिकार्‍याची नेमणूक करावी, अशी मागणी संघटनांकडून करण्यात आली आहे.( Kunabi Certificate)

कुणबी दाखल्यासाठी १३ कागदपत्रे तपासण्यात येणार – मराठा-कुणबी, कुणबी-मराठा जातीचे प्रमाणपत्र देण्यासाठी खासरा पत्रक, पाहणी पत्रक, क-पत्रक, कुळ नोंदवही, नागरिकांचे राष्ट्रीय रजिस्टर सन १९५१, नमुना नं. १ हक्क नोंद पत्रक, नमुना नं. ०२ हक्क नोंद पत्रक आणि सातबारा उतारा हे महसुली अभिलेखे तपासली जाणार आहेत. जन्म-मृत्यू नोंदी रजिस्टर (गाव नमुना १४), शैक्षणिक अभिलेख्यामध्ये प्रवेश निर्गम नोंदवही/जनरल रजिस्टर, रेल्वे पोलिस विभागाकडील गुन्ह्याबाबतच्या नोंदी, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांच्याकडील माजी सैनिक निवृत्तीनंतर नोंदणीकरिता करण्यात आलेली कागदपत्रे, जिल्हा वक्फ अधिकारी यांच्याकडील मुतखब, १९६७ पूर्वीचे अधिकारी-कर्मचार्‍यांचे सेवापुस्तक, महानगरपालिका आणि नगरपालिकेकडील शेतवार तक्ता वसूल व आमदनी नोंदवही आणि सैन्य भरती कार्यालयाकडील सैन्य भरतीच्यावेळी घेतलेल्या नोंदी तपासण्यात येतील.सहायक जिल्हा निबंधक तथा मुद्रांक जिल्हाधिकारी यांच्याकडील खरेदीखत नोंदणी केलेले रजिस्टर, डे-बुक, करार खत, साठेखत, इसारा पावती, भाडे चिठ्ठी, ठोके पत्र, बटाई पत्र, दत्तक विधान, मृत्युपत्र, इच्छापत्र, तडजोड पत्र व इतर दस्त तपासण्यात येतील. भूमी अभिलेख विभागाकडील पक्का बुक, शेतवार पत्रक, वसुली बाकी, उल्ला प्रतिबुक, रिव्हीजन प्रतिबुक, क्लासर रजिस्टर, हक्क नोंदणी पत्रक, नमुना-३३ , नमुना-३४ आणि टिपण बुक तपासण्यात येणार येणार असल्याचे सांगण्यात आले.(Maratha Reservation)

संबंधित लेख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!