Tuesday, October 22, 2024
Homeताज्या बातम्याउद्योगनगरी सणसवाडी येथे तुतारीच्या जल्लोषपूर्ण गर्जनेत डॉ कोल्हे यांचा जोरदार प्रचार

उद्योगनगरी सणसवाडी येथे तुतारीच्या जल्लोषपूर्ण गर्जनेत डॉ कोल्हे यांचा जोरदार प्रचार

माजी सभापती सुजाता पवार व सणसवाडीतील आजी माजी पदाधिकारी यांचा तुतारीचा प्रचार जोरात

सणसवाडी (ता.शिरूर) येथे दोन तुतारी वाजवणाऱ्या माणसाच्या हातून तूतारीच्या गर्जनेत महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार व राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार डॉअमोल कोल्हे यांच्या प्रचारार्थ माजी सभापती सुजाता पवार यांचा मतदार व नागरिकांच्या घरोघरी भेट देत डॉक्टर अमोल कोल्हे यांचे संसदेतील काम व प्रचारपत्रक वाटण्यात येऊन व प्रचंड बहुमताने विजयी करावे असा जनसंवादसभापती सुजाता पवार यांनी सर्वसानु नागरिक व मतदारांशी साधला.

    आमदार अशोक पवार व माजी सभापती सुजाता पवार यांचे उद्योगनगरी सणसवाडी यांचे जिव्हाळ्याचे संबंध असून याचा पुन्हा एकदा प्रत्यय आला.रामकृष्ण हरी… वाजवा तुतारी अशा घोषणा देत सणसवाडी येत जोरदार प्रचार करण्यात आला.यराष्ट्रवादी काँग्रेस  शरदचंद्र पवार, काँग्रेस, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते कार्यकर्ते ,पदाधिकारी,सर्वसामान्य नागरिक व मतदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

    तुतारी वाजवणाऱ्या माणसाकडून जोरदार तुतारी वाजवून प्रचार फेरीला उत्साहाच्या वातावरणात सुरुवात करण्यात आली. सणसवाडी येथील मुख्य बाजार पेठेतून प्रचार फेरीला तुतरीच्या गर्जनेत  उत्साहाच्या वातावरणात सुरुवात करण्यात आली. यावेळी सणसवाडीती आजी माजी पदाधिकारी उपस्थित होते.महिला भगिनिबव युवतींची विशेष लक्षणीय उपाठ8ती होती तर यावेळी सणसवाडीतील व्यापारी, कामगार, मजूर, सर्वसामान्य मतदार यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला या प्रचार फेरीची सांगता ग्रामदैवत श्री भैरवनाथ महाराजांच्या आरतीने करून सांगता करण्यात आली.

संबंधित लेख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!