तळेगाव ढमढेरे : शिक्षक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी शिक्षकांचे विविध प्रश्न निकाली काढण्याची मागणी शिक्षक आमदार व शिक्षण विभागाचे अधिकारी यांच्याकडे सभेच्या वेळी करण्यात आली.
शिक्षण आयुक्त कार्यालयात पुणे विभागाचे शिक्षक आमदार प्रा. जयंत असगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली विविध शैक्षणिक प्रश्नांसंदर्भात सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आयुक्त कार्यालयाच्यावतीने हरुण आतार (शिक्षण उपायुक्त ),डॉ. वंदना वाहुळ मॅडम (शिक्षण उपसंचालक ),कृष्णा डहाळे (अधिक्षक ) आदी शिक्षण विभागाचे आधिकारी उपस्थित होते.
यावेळी महाराष्ट्र राज्य शिक्षकेतर महामंडळाचे सहकार्यवाह शिवाजीराव खांडेकर व महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षक संघाचे(फेडरेशन ) समन्वयक दादासाहेब गवारे यांनी अनेक प्रश्न उपस्थित केले व तातडीने प्रश्न निकाली काढण्याची विनंती केली.
यावेळी आमदारांनी प्रशासकीय कामकाजाबद्दल नाराजी व्यक्त केली. विशेषता पुणे जिल्हा भविष्य निर्वाह निधी व वेतन पथकाबाबत (पे. युनिट ) त्यांच्या गलथान कारभारामुळे अनेक समस्या निर्माण होतात. त्यासंबंधी कडक उपाययोजना करण्याची सुचना वरिष्ठांना केली.
प्रशासनाने दखल घेऊन ठोस पाउले उचलण्याचे मान्य केले. झाली,पेंडीग पगारबीले. फरक बिले,१ तारखेला पगार करणे,पी.एफ. स्लीपा व पी. एफ. प्रकरण,मेडिकल बीले. सेवानिवृत्तांची विविध पेंडींग बीले ,शालार्थ प्रणालीमध्ये शिक्षक व सेवकांची नावे समाविष्ट करणे,अनुकंपाखालील पदे ताबडतोब भरणे व मान्यता देणे,शिक्षक व सेवकांची पदोन्नती,शिक्षक-सेवकांची रिक पदे त्वरित भरणे,वैयक्तिक मान्यता देणे. आदी विषयांवर सविस्तर चर्चा होऊन. तातडीने उपाययोजना करण्याचे ठरले.सभेमध्ये या विषयावर चर्चा झाली.