शेतकऱ्यांना टँकरने पाणी देण्याची गरज भासू लागली
कोरेगाव भिमा – डिंग्रजवाडी (ता.शिरूर) येथील स्मशान भूमी येथील डी पि चोरट्यांनी चोरून नेल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत होते.याबाबत राष्ट्रवादी विद्यार्थी पुणे जिल्हा उपाध्यक्ष सागर गव्हाणे व संचालक दत्तात्रय भाऊसाहेब गव्हाणे यांनी आमदार अशोक पवार यांना शेतकऱ्यांची समस्या सांगितली व तातडीने डी पि उपलब्ध करणे देण्याची मागणी केली असता आमदार अशोक पवार यांनी एम एस सी बी चे अधिकारी नितीन महाजन यांना संपर्क करत तातडीने डी पि उपलब्ध करून देण्याची सूचना केली असता संबधित डी पि उपलब्ध झाल्याने डिंग्रजवाडी येथील शेतकऱ्यांनी आनंद व्यक्त केला.
ग्रामीण भागात शेतकऱ्यांच्या डी पि चोरण्याचा चोरांनी सपाटा लावला असून यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. डिंग्रजवाडी येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये विद्यार्थ्यांना आर्थिक व व्यवहारी शिक्षण मिळावे आठवडे बाजाराचे आयोजन केले होते त्यावेळी आमदार अशोक पवार यांनी भेट दिली यावेळी नागरिकांनी डी पि चोरी गेली असून शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होईल व शेतकऱ्यांना टँकरने पाणी द्यावे लागेल अशी समस्या आमदार अशोक पवार यांना सांगितली होती याबाबत राष्ट्रवादी विद्यार्थी पुणे जिल्हा उपाध्यक्ष सागर गव्हाणे व संचालक दत्तात्रय भाऊसाहेब गव्हाणे यांनी आमदार अशोक पवार यांना संबधित डी पि व शेतकऱ्यांच्या अडचणींबाबत सांगितले असता आमदार पवार यांनी तातडीने एम एस सी बी चे शिक्रापूर अभियंता नितीन महाजन यांना सूचना केली असता तातडीने डी पि उपलब्ध करून दिल्याने नागरिकांनी आमदार अशोक पवार, एम एस सी बी चे नितीन महाजन, वायरमन राहुल गव्हाणे यांचे आभार मानले.
यावेळी माजी उपसरपंच दत्तात्रय गव्हाणे, जय हनुमान पतसंस्थेचे संचालक दत्तात्रय गव्हाणे, संभाजी गव्हाणे, शहाजी गव्हाणे, बापूसाहेब गव्हाणे, मारुती गव्हाणे , काका गव्हाणे ,रवींद्र गव्हाणे, प्रभाकर गव्हाणे, अवधूत गव्हाणे, संदीप गव्हाणे, माजी ग्रामपंचायत सदस्य बापूसाहेब माकर, कृष्णा गव्हाणे, किरण गव्हाणे, संतोष गव्हाणे उपस्थित होते.