Tuesday, November 19, 2024
Homeसाहित्य/सामाजिकचला व्यक्त होऊ या?अभिमानास्पद! शिरूर तालुक्यातील केंदुरचे सुपुत्र सिध्देश साकोरेचा जागतिक स्तरावर डंका

अभिमानास्पद! शिरूर तालुक्यातील केंदुरचे सुपुत्र सिध्देश साकोरेचा जागतिक स्तरावर डंका

केंदूरचा सिध्देश साकोरे युनायटेड नेशन्सने ठरविला ’लॅंड हिरो’ : जर्मनीत भव्य कार्यक्रमात सिध्देशला सन्मानपत्र प्रदान

केंदूर (ता.शिरूर) येथील सिद्धेश बाळासाहेब साकोरे या युवकाची संयुक्त राष्ट्र संघटनेच्या युनायटेड नेशन्स कन्व्हेन्शन टू कॉम्बॅट डेजर्टिफिकेशन (UNCCD) च्या प्रतिष्ठित ‘लँड हिरो’ या सन्मानासाठी नुकतीच निवड झाली. या निमित्ताने त्यांना जर्मनीत भव्य समारंभात सन्मानित करण्यात आले. सद्यस्थिती जगभरातील लागवडयोग्य जमिनींचा पोत ऱ्हास करणाऱ्या कारणांचा शोध आणि त्यावर ठोस उपाययोजनांच्या समस्यांशी लढण्यासाठीच्या केलेल्या नावीन्यपूर्ण उपायांची जागतिक पातळीवर संयुक्त राष्ट्र संघटनेने दखल घेत वरील पुरस्कार सिध्देश यांना प्रदान झाला.  

         सिद्धेश हे केंदूरमधील महादेववाडीतील एका अल्पभूधारक शेतकरी कुटुंबात वाढलेले. इयत्ता दहावी त्यांनी धामारी (ता.शिरूर) येथे केली तर पुढे पुण्यात मॅकेनिकल इंजिनिअर होवून ते त्यांचे महाविद्यालयीन मित्र जयदीप बबनराव सरोदे (मुळ गाव पिंपळगाव-पिसा, ता.श्रीगोंदा, जि.अ.नगर) यांना सोबत घेऊन पाबळ (ता.शिरूर) येथील विज्ञान आश्रमात शेतीशी संबंधित प्रश्नांवर संशोधन करीत धामारीत या दोघांनी काही शेतक-यांना सोबत घेवून अ‍ॅग्रो रेंजर्स संस्था स्थापन करुन त्याद्वारे शिरुर-आंबेगाव-खेड या तीन तालुक्यातील १ हजार शेतक-यांसोबत काम सुरू केले. यात शेतीच्या पोत ऱ्हासाची कारणे शोधून त्यावर या दोघांनी उपाययोजना करुन सेंद्रीय कर्ब ०.०३ (धोकेदायक) पासून तो ०.०१ (सुरक्षित) इतका करुन दाखविला. याच त्यांच्या प्रयोगाची दखल थेट संयुक्त राष्ट्र संघटनेच्या युनायटेड नेशन्स कन्व्हेन्शन टू कॉम्बॅट डेजर्टिफिकेशन (UNCCD) यांनी घेतली व सिद्धेश यांना युनायटेड नेशन्सचे जनरल सेक्रेटरी इब्राहीम थिऑ यांनी लॅंड हिरो म्हणून जाहीर करीत त्याचा भव्य सत्कारही केला. दरम्यान सिध्देशच्या या यशाबद्दल विज्ञान आश्रमचे वतीने खास सेलिब्रेशन लवकरच संस्थेत केले जाणार असून धामारी व केंदूरमधील ग्रामस्थही सिध्देश भारतात परतल्यावर त्याचा जंगी सत्कार करणार असल्याची माहिती डॉ.योगेश कुलकर्णी व केंदूरचे सरपंच अमोल थिटे यांनी दिल

सिध्देश-जयदीपची अ‍ॅग्रो-रेंजर्स – शेती केवळ कुणाच्या मेहेरबाणीवर किंवा मदतीवर पिकविण्याची शेतक-यांची मानसिकता पूर्णत: बदलण्याच्या हेतूने सिध्देश व जयदीप या अभियंता जोडगोळीने त्यांची अ‍ॅग्रो-रेंजर्स संस्था विज्ञान आश्रममध्ये असतानाच सन २०१९ मध्ये स्थापन केली. विज्ञान आश्रममध्ये संशोधनात्मक काम होत असल्याने ही संशोधन वृत्ती या दोघांनी धामारीत अ‍ॅग्रो रेंजर्सच्या निमित्ताने वास्तवात आणली आणि तीन तालुक्यातील तब्बल १ हजार शेतक-यांसोबत प्रत्यक्ष काम करुन कर्ब सुधारण्याचे मोठे दिव्य अगदी साध्या उपायांनी पार पाडले.    

नेमकी उपाययोजना ती काय केली सिध्देशने…! सिध्देश या लॅंडहिरोने आपल्या मित्र जयदीपच्या साथीने सर्वप्रथम शेतीतील पिकपध्दती, माती घटक, पाणी स्थिती, रासायनिक व सेंद्रीय खतांचा वापर याचा वास्तविक अभ्यास करुन साध्या उपाययोजना म्हणून शेतीत फळबागा करणे आणि त्यात आंतरपिकांची लागवड करणे एवढ्य सोप्या उपायांनी त्यांनी एक हजार शेतक-यांचा शेतीचा ०.०३ (धोकेदायक पातळी) पासूनचा कर्ब ०.१ (सुरक्षित पातळी) पर्यंत आणून दाखविला. अर्थात ०.३ (पूर्णत: कसदार पातळी) एवढा कर्ब म्हणजे समृध्द शेतीचा निर्देशांक असतो. एवढ्या पर्यंत नेण्यासाठीचे प्रयत्नही या दोघांची अजुन सुरू असल्याची माहिती सिध्देशचे वतीने जयदीप यांनी दिली. 

संबंधित लेख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!