कोरेगाव भीमा – सणसवाडी ( ता.शिरूर)
रावसाहेबदादा पवार घोडगंगा सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी आमदार अशोक पवार यांचे चिरंजीव तरुण संचालक तथा ऋषिराज पवार यांची निवड झाल्यामुळे त्यांच्या सत्करासाठी विविध मान्यवर येऊ लागले यावेळी त्यांनी अभिनंदनासाठी हारतुरे , पुष्पगुच्छ नको कामगारांच्या मुलांसाठी खाऊ,वह्या पुस्तके व संसारोपयोगी वस्तू द्या असे आवाहन केले यातून त्यांनी सामाजिक बांधिलकी जपली आहे तसेच घराण्याचा सामाजिक उत्तरदायित्व वसा आणि वारसा चालवण्याचा जणू कृतीयुक्त संदेश दिला आहे.
आमदार अशोक पवार व माजी सभापती सुजाता पवार यांचा व सणसवाडी कारणाचा ऋणानुबंध तालुक्याला परिचित आहे.आमदार पवार यांच्या सुखदुःखात सहभागी असणारे व त्यांच्या प्रत्येक आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देणारे गाव म्हणजे सणसवाडी याचाच प्रत्यय पुन्हा आला असून अध्यक्ष ऋषिराज पवार यांच्या आवाहनाला सर्वात प्रथम सणसवाडी करांनी प्रथम प्रतिसाद दिला. कारखान्याच्या कामगारांच्या मुलांसाठी त्यांनी वह्या देत तरुण संचालक व अध्यक्ष ऋषिराज पवार यांचा सत्कार केला.
यावेळी पुणे जिल्हा नियोजन समिती सदस्य पंडित दरेकर,माजी चेअरमन सुहास दरेकर, युवा नेते निलेश दरेकर उपस्थित होते.