पावसाळी अधिवेशनात लक्षवेधीद्वारे आमदार अशोक पवार यांच्याकडून वाघोली येथील अनेक प्रश्न उपस्थित
पुणे – राज्याच्या पावसाळी अधिवेशनात शिरूर – हवेलीचे आमदार अशोक पवार यांनी वाघोली गावाचे अनेक उपस्थित केले. वाघोली येथील लोकांना टँकरसाठी दरमहा १५ कोटी रुपये खर्च करावे लागतात. एका वर्षात १८० कोटी रुपये जर सामान्य माणसाला खर्च करावे लागत असतील तर त्यांना न्याय कोण देणार, असे अनेक महत्वपूर्ण प्रश्न आमदार अशोक पवार यांनी सभागृहात उपस्थित केले.(Pune – MLA Ashok Pawar of Shirur – Haveli attended the monsoon session of the state and many people of Wagholi village were present. People of Wagholi have to spend Rs 15 crore per month for tankers. MLA Ashok Pawar raised many important questions in the House that if a common man has to spend 180 crore rupees in a year, then who will give justice to them?)
शिरूर- हवेली विधानसभा मतदारसंघातील वाघोली (wagholi) गावात ०३ लाख ५० हजार इतकी लोकसंख्या आहे. याठिकाणी एक आयव्ही इस्टेट रोड, बकोरी रोड व फुलमळा रोड आहे. ज्याठिकाणी २५ हजार लोकं राहतात व ६ हजार फ्लॅट आहेत. येथे जाण्यासाठी फक्त १० फुटांचा रस्ता आहे. अशा विकासकांना पीएमआरडीएकडून परवानगी देण्यात येते. या परवानग्या कोणी दिल्या? असा प्रश्न निर्माण होतो. यामध्ये काही गैरव्यवहार झाला आहे का? अशी शंका निर्माण होते. यावर शासनाने न्याय द्यायला हवा व रस्त्यांच्या त्रासातून लोकांची सुटका करायला हवी.
पीएमआरडीएकडे (PMRDA)सार्वजनिक विकासाच्या जागा उपलब्ध असूनही त्या पीएमसीकडे का दिल्या जात नाही? डीपी प्लॅनची वाट का पाहिली जाते? डीपी प्लॅन हा वेळेतच झाला पाहिजे. तेव्हाच वाघोली गावच्या लोकांच्या समस्या सुटतील. इतकं मोठं गाव असताना त्याठिकाणी २२० केव्हीचं एमएसईबीचं सबस्टेशन पाहिजे. त्याच्या जागेचा प्रश्न हा पीएमआरडीए व पीएमसीने सोडवला पाहिजे. गावात पोलीस स्टेशन नाही, कुठेतरी पोलीस ठाणं आहे. सांडपाण्याच्या व्यवस्थेसाठी काही उपाययोजना नाही, गावाला एसटीपीची सोय हवी. तसेच गावात घनकचरा प्रकल्प उभं राहणं गरजेचं आहे.
याठिकाणी जवळपास १०० एकराची झोपडपट्टी वसाहत आहे. मुंबईप्रमाणेच वाघोली गावातही काही योजना आणून चांगली घरं बनवावी. याठिकाणी ३७५ हौसिंग सोसायट्या आहेत. येथील लोकांना टँकरसाठी दरमहा १५ कोटी रुपये खर्च करावे लागतात. एका वर्षात १८० कोटी रु. जर सामान्य माणसाला खर्च करावे लागत असतील तर त्यांना न्याय कोण देणार, असे अनेक महत्वपूर्ण प्रश्न आमदार अशोक पवार यांनी सभागृहात उपस्थित केले.
आमदार पवार यांनी वाघोली करांच्या अत्यंत जिव्हाळ्याच्या व दैनंदिन जीवनाशी निगडित प्रश्नांना मांडल्याने हवेली येथील नागरिक समाधान व्यक्त करत आहेत तर आमदार पवार हे वाघोली येथील प्रश्नावर आक्रमक होताना दिसत आहे.