Friday, November 22, 2024
Homeक्राइमPune Porsche accident case, विशाल अग्रवालवर शाईफेक, वंदे मातरम् संघटन आक्रमक

Pune Porsche accident case, विशाल अग्रवालवर शाईफेक, वंदे मातरम् संघटन आक्रमक

ॲड मोहम्मद शेख

पुण्यातील पोर्शे अपघात प्रकरणातील (Pune Porsche accident case) आरोपीवर वंदे मातरम संघटनेकडून आज (दि.२२) शाईफेक करण्यात आली. विशाल अग्रवाल याला न्यायालयात नेताना हा प्रकार घडला. पोलिसांनी आरोपी विशाल अगरवालला अटक केली आहे. (२२ मे) पोलीस त्यांना न्यायालयात हजर करण्यासाठी घेऊन जात होते.

यावेळी वंदे मातरम संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आरोपीच्या तोंडावर शाईफेक करण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी कार्यकर्त्यांना अडवलं आणि आरोपी बचावला. दरम्यान, कार्यकर्ते शाईफेक करू शकले नसले तरी त्यांनी पोलिसांच्या वाहनासमोर उभे राहून जोरदार घोषणाबाजी केली.

वंदे मातरम संघटनेचे कार्यकर्ते म्हणाले, ‘आरोपीला मोक्का या कायद्याअंतर्गत अटक केली पाहिजे. या बिल्डरवर याआधी अनेक गुन्हे दाखल आहेत आणि आता त्याच्या मुलाने हा किळसवाणा प्रकार केला आहे.’यावेळी न्यायालयाबाहेर संघटनेच्या कार्यकर्त्यांनी निदर्शने केली. कार्यकर्ते आक्रमक झाले होते. आरोपीवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्य़ाची मागणी यावेळी करण्यात आली.

विशाल अग्रवालवर शाईफेक का केली?विशाल अग्रवाल याच्या मुलाने भरधाव कारने दुचाकीवरील दोघांना उडवले.याप्रकरणी दोषींवर कारवाई करण्यासाठी वंदे मातरम संघटना आक्रमकविशाल अग्रवाल याला न्यायालयात नेताना शाईफेक करण्य़ात आली.आरोपींवर मोक्का अंतर्गंत कारवाई करण्याची मागणी

संबंधित लेख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!