Thursday, September 19, 2024
Homeक्राइमDr. Narendra Dabholkar : डॉ. नरेंद्र दाभोळकरांच्या हत्येप्रकरणी सचिन अंदूरे व शरद...

Dr. Narendra Dabholkar : डॉ. नरेंद्र दाभोळकरांच्या हत्येप्रकरणी सचिन अंदूरे व शरद कळसकर यांना जन्मठेव तर तिघे निर्दोष

ॲड मोहम्मद शेख

पुणे – महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक नरेंद्र दाभोळकर (Dabholkar murder) यांच्या हत्येप्रकरणात पुणे सत्र न्यायालयाने आज (दि.१०) महत्त्वाचा निर्णय देत दोघांना दोषी ठरवले आहे तर तीन आरोपींना निर्दोष ठरवले आहे.

पुणे सत्र न्यायालयाने सचिन अंदुरे आणि शरद कळसकर यांना दोषी ठरवलं आहे. दोघांना कोर्टाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. तर याप्रकरणातील आरोपी वीरेंद्र तावडे, विक्रम भावे आणि संजीव पुनाळेकर यांना कोर्टाने निर्दोष ठरवलं आहे. तावडे, पुनाळेकर आणि भावे यांच्याविरोधातील आरोप सिद्ध होत नाही, असं कोर्टाने म्हटलं. विशेष सत्र न्यायाधीश पी.पी. जाधव यांच्या निकालाकडे राज्याचं लक्ष लागलं होतं.

२ दोघांना जन्मठेप, ३ निर्दोष – अंनिसचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्या हत्या प्रकरणात पाच आरोंपींविरोधात दोषारोप पत्र दाखल करण्यात आले होते. यापैकी शरद कळसकर आणि सचिन अंदुरे याच्यावर गुन्हा सिद्ध झाल्याने ५ लाखाचा दंड आणि जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. तर डॉक्टर वीरेंद्र तावडे विक्रम भावे आणि संजीव पुनाळेकर यांच्यावरही या हत्येत संशय होता. मात्र सबळ पुराव्या अभावी त्यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली.

डॉ. नरेंद्र दाभोळकर (Narendra Dabholkar) लयांची २० ऑगस्ट २०१३ साली पुण्यातील ओंकारेश्वर मंदिराजवळील महर्षी विठ्ठल रामजी शिंदे पुलावर हत्या करण्यात आली होती. दुचाकीवरून आलेल्या आरोपींनी त्यांच्यावर गोळ्या झाडल्या होत्या. यातील एक गोळी दाभोलकर यांच्या छातीत, तर दुसरी गोळी त्यांच्या डोक्यात लागली होती.या घटनेत दाभोलकर यांचा मृत्यू झाला होता.

या हत्याकांडाने महाराष्ट्रासह संपूर्ण देशात मोठी खळबळ उडाली होती. सुरुवातीला या घटनेचा तपास पुणे पोलिसांनी केला होता. मात्र, त्यानंतर हे प्रकरण एटीएस आणि शेवटी केंद्रीय अन्वेषण विभागाकडे वर्ग करण्यात आला.२०१८ साली गौरी लंकेश यांच्या हत्या प्रकरणाचा तपास करणाऱ्या कर्नाटक एटीएसने पुण्यात येऊन एका आरोपीला अटक केली. त्यानंतर दाभोलकर यांच्या हत्या प्रकरणातील धागेदोरे सापडले. या गुन्ह्यातील आरोपी डॉ. वीरेंद्रसिंह तावडे, सचिन अंदुरे, शरद कळसकर, संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावे या पाच जणांवर १५ सप्टेंबर २०२१ ला आरोप निश्चित करण्यात आले.

सीबीआयचे वकील प्रकाश सूर्यवंशी यांनी या प्रकरणात २० साक्षीदार तपासले. बचाव पक्षाचे वकील प्रकाश साळसिंगीकर, ॲड. वीरेंद्र इचलकरंजीकर आणि ॲड. सुवर्णा आव्हाड यांनी काम पाहिले. त्यांनी दोन साक्षीदार न्यायालयात हजर केले होते. आता या प्रकरणाची सुनावणी पूर्ण झाली असून आज कोर्टाने निकाल दिला.

संबंधित लेख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!