Thursday, November 21, 2024
Homeसाहित्य/सामाजिकचला व्यक्त होऊ या?प्रेरणादायी ! पोरक्या नम्रताने अवघ्या पाच महिन्यात मिळवल्या चार सरकारी नोकऱ्या

प्रेरणादायी ! पोरक्या नम्रताने अवघ्या पाच महिन्यात मिळवल्या चार सरकारी नोकऱ्या

आजी चंद्रभागा तांबारे व मावशी छाया अशोक पाटील यांच्या पाठबळावर तलाठी ते MPSC मध्ये ‘सब रजिस्टार’ पदी निवड

नम्रता दत्तात्रय पौळ या २४ वर्षांच्या मुलीने स्पर्धा परीक्षा देत एकाच महिन्यात दोन पोस्ट ‘क्रॅक’ केल्याचे कौतुक होत असतानाच सलग दुसऱ्या महिन्यात लोकसेवा आयोगाची तिसरी पोस्ट काढली होती. आता तर तिच्या नावे आणखी एक ‘रेकॉर्ड’ झालं असून, लोकसेवा आयोगाच्या ‘सब रजिस्टार’ पदाला गवसणी घालत अवघ्या पाचव्या महिन्यात यशाचा चौकार’ तिने लगावला आहे.वाशी तालुक्यातील तेरखेडा येथील मूळ असणारी सध्या कळंब तालुक्यातील आंदोरा येथे राहायला असून नम्रता दत्तात्रय पोळ या मुलीने येथील ध्येयवेडे होत जिद्द, कष्ट, सातत्य व अथक प्रयत्नांच्या बळावर नम्रताने अवघ्या पाच महिन्यांत शासनाच्या विविध विभागांच्या चार स्पर्धा परीक्षेत ‘पोस्ट क्रॅक’ करत अद्वितीय असे नेत्रदीपक यश मिळवले.(MPSC)

खेड्यात राहून मिळवेल यश – लहानपणीच मातापित्यांचे छत्र हरवलेल्या नम्रता आणि तिच्या भावंडांचा सांभाळ आंदोरा येथील आजी चंद्रभागा तांबारे व मावशी छाया अशोक पाटील हे मोठ्या मायेने करत आहेत. याच बळावर आपल्या दोन भावंडांसह नम्रता खंबीरपणे स्पर्धेला तोंड देत स्वयंसिद्धा ठरली आहे. आंदोरा येथील जि. प. प्राथमिक शाळेत प्राथमिक, कळंब येथील सावित्रीबाई फुले शाळेत माध्यमिक व उच्चमाध्यमिक तर छत्रपती शिवाजी महाविद्यालयात बीएस्सीचे शिक्षण तीने घेतले आहे. विशेष म्हणजे, नम्रताने पुणे, मुंबई न गाठता आंदोरा या खेड्यात वास्तव्य करत स्पर्धा परीक्षेत हे यश मिळवले आहे.( MPSC RESULT)

पाच महिन्यात चार सरकारी पदांना गवसणी -नम्रता पौळची प्रथम २०० पैकी १९६ गूण घेत बीड येथे २४ जानेवारी रोजी तलाठी पदावर नियुक्ती झाली. यानंतर १३ मार्चला तीची एमपीएसीमार्फत विक्रीकर अधिकारी पदी निवड झाली. या यशाचे कौतुक होत असतानाच अवघ्या तीस दिवसात सहाय्यक कक्ष अधिकारी आणि मंगळवारी ‘सब रजिस्टार’ या वर्ग दोन पदावर नम्रताची निवड झाल्याने तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.(MPSC EXAM)

संबंधित लेख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!