पूर्व हवेलीतील कदमवाकवस्ती ग्रामपंचायत येथे विशाल गुजर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून जनसंपर्क कार्यालयाच्या उद्घाटन करण्यात आले. यावेळी जिल्हा बॅकेचे नवनिर्वाचित संचालक प्रदीप कंद व पुणे महानगरपालीका नियोजन सदस्य पदी निवड झालेले स्वप्नील उंद्रे यांचा सत्कार नागरी सत्कार करण्यात आला.
यावेळी दौंडचे आमदार राहूल कूल, पुणे जिल्हा बॅकेचे संचालक प्रदीप कंद, महाराष्ट्र राज्य कार्यकारिणी सदस्य रोहिदास उंद्रे, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष जालिंदर कामठे, पुर्व हवेली अध्यक्ष संदीप भोंडवे, पुणे जिल्हा उपाध्यक्ष दादासाहेब सातव, पुणे महानगर नियोजन सदस्य व मांजरी खुर्द चे सरपंच स्वप्नील उंद्रे, सुदर्शन चौधरी, पुनम चौधरी सुप्रीया गोते, शाम गावडे अमोल शिवले, ज्ञानेश्वर काळभोर, ह. भ. प. सुशील महाराज काळभोर, बाबासाहेब चव्हाण, प्रदीप गुजर, राकेश लोंढे, नितीन टिळेकर, शेखर काळभोर, छत्रपती ग्रुप, राजकीय दादा मित्र परिवार व कदमवाकवस्ती ग्रामपंचायत पंचक्रोशीतील असंख्य कार्यकर्ते हजर होते प्रास्ताविक प्रविण काळभोर व सुत्रसंचालन (शाहिर) महेश खुळपे यांनी आभार विशाल गुजर यांनी मानले
कदमवाकवस्ती येथील नागरिकांसाठी केंद्र सरकारच्या शासकीय योजना विशाल गुजर यांच्या जनसंपर्क कार्यालयाच्या माध्यमातून राबविण्यात येऊन जनसामान्यांची सेवा करण्यात येणार आहे -संदिप भोंडवे , हवेली तालुकाध्यक्ष भाजप