उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या डोळ्यात धूळफेक करण्याचे पाप केले असा प्रश्न उपस्थित करत महायुतीच्या नेत्यांना कोल्हेंचा थेट सवाल
पुणे – जुन्नर डीजीएफटीने कांदा निर्यातबंदी उठवल्याचे कोणतेही नोटीफिकेशन काढलेले नाही.याचाच अर्थ कांदा निर्यात बंदी उठलेलीच नाही. कांदा निर्यातबंदीवरुन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या डोळ्यात धूळफेक करण्याचं पाप केल्याची घणाघाती टीका शिरुर लोकसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांनी केली. महाराष्ट्राची भाकरी खाऊन, गुजरातची चाकरी करण्याची असले तर महाराष्ट्राने का तुम्हाला साथ द्यावी, याच उत्तर द्यावं, असा थेट सवाल डॉ. अमोल कोल्हे यांनी केलाय.
केंद्र सरकारने कांदा निर्यातबंदी उठवल्यासंबधी कोणतेही नोटीफिकेशन काढलेले नाही. याचाच अर्थ कांदा निर्यात बंदी उठलेलीच नाही. कांदा निर्यातबंदीवरुन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या डोळ्यात धूळफेक करण्याचे पाप केल्याची घणाघाती टीका शिरुर लोकसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांनी केली.
महाविकास आघाडी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार खासदार डॉ. अमोल कोल्हे आज जुन्नर तालुक्याच्या दौऱ्यावर आहेत. त्यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कांदा निर्यातबंदी बद्दल केलेल्या गुजरातच्या कांद्याची निर्यातबंदी ज्यांनी उठवली आणि गुजरातच्या शेतकऱ्यांच भल केलं. आणि त्यानंतर महाराष्ट्रात रोष निर्माण झाल्यावर, त्यामुळं घाईघाईने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना खोट ट्विट करावं लागतं असेल तर, फडणवीस आणि महायुतीच्या नेत्यांनी, महायुतीच्या उमेदवारांनी याच उत्तर द्याव, महाराष्ट्राची भाकरी खाऊन, गुजरातची चाकरी करण्याची असले तर महाराष्ट्राने का तुम्हाला साथ द्यावी, याच उत्तर द्यावं, असं थेट सवाल डॉ, अमोल कोल्हे यांनी केलाय.
महाराष्ट्राने का तुम्हाला साथ द्यावी – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना त्यामुळं घाईघाईने खोट ट्विट करावे लागत असेल तर, फडणवीस आणि महायुतीच्या नेत्यांनी, महायुतीच्या उमेदवारांनी याच उत्तर द्यावे, महाराष्ट्राची भाकरी खाऊन, गुजरातची चाकरी करणार असाल तर महाराष्ट्राने का तुम्हाला साथ द्यावी, याचे उत्तर द्यावे, असा थेट सवाल डॉ. कोल्हे यांनी केला आहे.
केंद्र सरकारने ६ देशात कांदा निर्यात करण्यास परवानगी दिल्याने कांदा निर्यातबंदी उठवण्यात आली आहे. बांग्लादेश, युएई, भूटान, बहरीन, मॉरिशस आणि श्रीलंकेत भारताचा कांदा निर्यात करण्यास परवानगी देण्यात आली. पांढरा कांदा आखाती व काही युरोपियन देशात निर्यात केला जाणार आहे. त्यामुळे, शेतकऱ्यांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे.