शिक्रापूर (ता. शिरुर) येथून इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड नोंद सर्पमित्र शेरखान शेख यांनी पशु पक्षांच्या रक्षणासाठी सुरु केलेल्या निसर्ग वन्यजीव सामाजिक संस्थेच्या उपाध्यक्षपदी सुरज विठ्ठल वाघमारे यांची निवड करण्यात आली आहे.
निसर्ग वन्यजीव सामाजिक संस्थेच्या माध्यमातून पुणे जिल्ह्यातील वेगवेगळ्या भागात वन्य पशु पक्षांना जीवदान देऊन निसर्गाच्या सानिध्यात मुक्त करण्याचे काम सेवाभावी वृत्तीने व प्राणीमात्रांवरील निरपेक्ष प्रेमापोटी संस्था अविरत काम करत असून सुरज वाघमारे हे देखील पशु पक्षांच्या रक्षणासाठी उत्कृष्ट काम केल्याने त्यांच्या कार्याची दखल घेत वाघमारे यांची नुकतीच निसर्ग वन्यजीव सामाजिक संस्थेच्या उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली असून निसर्ग वन्यजीव सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष शेरखान शेख, सचिव अमर गोडांबे, खजिनदार सिकंदर शेख, संचालक दत्ता कवाद, प्रवीण बामणे यांनी सुरज वाघमारे यांना निवडीचे पत्र दिले.
याप्रसंगी सर्पमित्र अभिजित वाघमारे, अमोल डाडर, साईदास कुसाळ, बाळासाहेब मोरे, निखिल कुंभार सर्पमित्र उपस्थित होते,