४ लाख ३८ हजार रूपये किंमतीचे दागिने हस्तगत
नितीन करडे
उरुळी कांचन – ससाणेनगर येथील एक कुटुंब गावी गेले घराचे कुलूप घरफोडी करणाऱ्या आरोपी निहालसिंग मन्नुसिंग टाक ऊर्फ शिखलकर याच्यासह साथीदारांना बेड्या ठोकल्या असून त्यांच्याकडून ४ लाख ३८ हजार रूपये किंमतीचे दागिने हडपसर पोलिसांनी हस्तगत केले आहेत.
ता.१२ फेब्रुवारी रोजी दुपारी ०३.०० वाजताच्या सुमारास त्यांचे ससाणेनगर येथील राहते घर कुलुप लावून बंद करून मुळगावी सांगली येथे गेले होते. त्यानंतर ता.१३ फेब्रुवारी पहाटे ०४.०० वा. चे सुमारास गुरव यांचे घरफोडी झाली असल्याची घटना घडली होती.अज्ञाता विरुद्ध हडपसर पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंदविण्यात आला होता.दाखल गुन्ह्याचे तपासादरम्यान हडपसर पोलीस ठाणेकडील वेगवेगळ्या गुन्ह्यात पोलीस अटकेत असलेला आरोपी निहालसिंग मन्नुसिंग टाक ऊर्फ शिखलकर, (वय १९ वर्ष ) रा.स नं ४, तुळजाभवानी वसाहत गाडीतळ हडपसर यांच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षक संतोष पांढरे यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे अटक असलेल्या आरोपीकडे अधिक तपास केला असता आरोपीने घरफोडी त्याचे साथीदारांसह केला असल्याची कबुली दिली व नेलेल्या सोन्याच्या दागिन्यांपैकी ७८ ग्रॅम २७० मि. ग्रॅम वजनाचे, किं. रु ४,३८,०००/- चे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले.
ही कामगिरी अमितेश कुमार पोलीस आयुक्त पुणे शहर, मनोज पाटील अप्पर पोलीस आयुक्त, पुर्व प्रादेशिक विभाग आर राजा पोलीस उप आयुक्त, परिमंडळ ५ यांचे मागदर्शनाखाली अश्विनी हडपसर विभाग सहाय्यक पोलीस आयुक्त राख मॅडम,हडपसर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष पांढरे,पोनि (गुन्हे) मंगल मोढवे, पोनि (गुन्हे) उमेश गित्ते , यांचे सुचनाप्रमाणे तपास पथकाचे सहा. पोलीस निरीक्षक अर्जुन कुदळे, प्रविण
अब्दागिरे, पोलीस उप निरीक्षक महेश कवळे, सुशील लोणकर, संदीप राठोड, सचिन जाधव, प्रशांत दुधाळ, निखील पवार, प्रशांत टोणपे, अजित मदने, अमोल दणके, चंद्रकांत रेजीतवाड, सचिन गोरखे, अमित साखरे, कुंडलीक केसकर, रामदास जाधव, यांचे पथकाने कामगिरी केली आहे.
सदर गुन्ह्याचा पुढील तपास प्रविण अब्दागिरे, सहा. पोलीस निरीक्षक हे करीत आहेत.