Thursday, November 21, 2024
Homeइतरकोरेगाव भिमा येथील नमर्देश्वर मंदिरामध्ये ५०० जोडप्यांच्या उपस्थितीत लिंगार्चन सोहळा भक्तिमय वातरणात...

कोरेगाव भिमा येथील नमर्देश्वर मंदिरामध्ये ५०० जोडप्यांच्या उपस्थितीत लिंगार्चन सोहळा भक्तिमय वातरणात उत्साहात साजरा

सोहळ्याच्या तृतीय वर्षीही भाविकांचा उदंड प्रतिसाद

कोरेगाव भिमा – कोरेगाव भिमा(ता.शिरूर) येथील फडतरे वस्तीवरील भीमा नदीच्या काठी श्री नमर्देश्वर मंदिरामध्ये महाशिवरात्री निमित्त लिंगार्चन सोहळ्याचे श्रीनिवास काका जोशी यांच्या पौराहित्याखाली आयोजन करण्यात आले होते. यावेळी कोरेगाव भिमा परिसरातील ५०० जोडप्यांच्या उपस्थितीत शिव लिंगार्चन सोहळा भक्तिमय वातावरणात उत्साहात पार पडला.

  ओम नमः शिवाय, नर्मदेश्वर महाराज की जय, नर्मदा मय्या की जय अशा जय घोषात गुरुवार आणि शुक्रवार दोन दिवस चाललेले शिवलिंग अर्चन पारायण सोहळा ५०० जोड्या सपत्नीक लिंग अर्चनाला बसले होते आपल्या हाताने मातीचे लिंग बनववत शिवभक्ती जागर करण्यात आला. या सोहळ्यास विशेषतः महिला भगिनि व भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याने मांडव पूर्ण भरला होता..सर्व भाविकांनी समर्पक व समर्पण भावनेने कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद आणि मदत केली.

श्रीनिवास काका करडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व विधी विधानासहित संपूर्ण सोहळा पार पडला.यावेळी त्यांना श्रीरंग काका जोशी व श्रीपती काका जोशी यांनी मोलाची मदत केली. या सोहळ्याचे हे तृतीय वर्षीही यशस्वी भव्य असे आयोजन करण्यात आले होते. मंदिरामध्ये दिवसभरात हजारो भाविकांनी दर्शनाचा व फराळाचा लाभ घेतला. यावेळी कोरेगाव भिमा पंचक्रोशीतील भाविक भक्त, महिला माता भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

         

संबंधित लेख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!