दौंड पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
पुण्यातील जगद्गुरु संत तुकाराम महाराज पालखी महामार्गावर महाराष्ट्र बँकेच्या वसुली एजंटचा धारधार हत्याराने भोकसून खून केल्याप्रकरणी दौंड पोलीस व स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने एका संशयित आरोपी दिपक रामदास लोंढे (वय-३७ वर्षे रा.वासुंदे ता. दौंड) असे अटक आरोपीची माहिती दौंड पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी दिली.
मिळालेल्या माहितीनुसार , आरोपीने त्याचेकडील लोखंडी दोनधारी हत्यार हे प्रवीण मळेकर यांचे पोटात खूपसले व प्रवीण मळेकर हे तेथून मोटार सायकलवर त्या परीस्थीतीत पुढे येवून वासुंदे गावातील इंडीयन ऑईल पेट्रोल पंपासमोरील रोडवर मोटार सायकलसह खाली पडले होत. त्यांना रोडने येताना रंजनाबाई मच्छिद्र लोंढे स्मृती स्थळासमोर हत्याराने मारलेले असल्याचे गोपनीय बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, स्मृती ठिकाणाचे जवळ राहणारा दिपक रामदास लोंढे (वय ३७ वर्षे) रा. वासुंदे, रंजनाबाई मच्छिंद्र लोंढे स्मृतीस्थळाजवळ ता. दौंड, जि. पुणे याने त्याचेकडील दोन्ही बाजूस धारदार असलेल्या लोखंडी हत्याराने मारून सदरचा खुन केल्याची माहिती मिळाल्याने इसम नामे दिपक रामदास लोंढे वय यास ताब्यात घेवून चौकशी केली असता त्याने खुनाचा गुन्हा केल्याचे सांगितले.
सदरचे खुन करण्यासाठी वापरणेत आलेले हत्यार हस्तगत करणेत आलेले आहे. आरोपीस मा. न्यायालयात हजर केले असता आरोपीची न्यायालयीन कस्टडी रिमांड मंजूर करणेत आली आहे.
पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, बारामती विभागाचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक संजय जाधव, दौंड उपविभागीय पोलीस अधिकारी स्वप्नील जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, दौंड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, सहाय्यक पोलीस निरीक्षक राहूल गावडे, अरविंद गटकुळ,तुकाराम राठोड, सहाय्यक फौजदार श्रीरंग शिंदे, शंकर वाघमारे, सुभाष राऊत, पांडुरंग थोरात, सागर म्हेत्रे, नितीन बोराडे, रवी काळे, अमीर शेख, संजय नगरे, अमोल देवकाते, शरद वारे, योगेश गोलांडे, महेश भोसले, किरण पांढरे, पोलीस जवान असिफ शेख, मंगेश ठिगळे, विजय कांचन, धिरज जाधव आदींनी ही कामगिरी केली.