Thursday, November 21, 2024
Homeक्राइमशिरूर तालुक्यातील धक्कादायक घटना ... जुन्या वादातून एकास मारहाण; उपचारादरम्यान जखमीचा मृत्यू

शिरूर तालुक्यातील धक्कादायक घटना … जुन्या वादातून एकास मारहाण; उपचारादरम्यान जखमीचा मृत्यू

शिरूर – शिरुर तालुक्यात जुन्या वादातून दोन जणांनी एका व्यक्तीस बेदम मारहाण केली. त्यानंतर त्याला जखमी अवस्थेत आधी शिरुर येथील खाजगी दवाखान्यात उपचारासाठी दाखल केले. त्यानंतर त्याला अहमदनगर येथील खाजगी दवाखान्यात दाखल करण्यात आले. परंतु उपचारादरम्यान त्या व्यक्तीचा (दि १४) रोजी मृत्यू झाला असुन याप्रकरणी संतोष रभाजी मोहीते आणि राहुल रभाजी मोहीते दोघे (रा.चव्हाणवाडी, ता. शिरुर, जि.पुणे) या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत शिरुर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार १२ जानेवारी २०२४ रोजी ६:३० वाजण्याच्या सुमारास चव्हाणवाडी येथील संतोष रभाजी मोहीते यांच्या घरासमोर संतोष रभाजी मोहीते आणि राहुल रभाजी मोहीते यांनी जुन्या भांडनाचा राग मनात धरुन बाळासाहेब माणिकराव गरुड (वय ५३) यांना शिवीगाळ व दमदाटी करुन लोखंडी खो-याने तसेच दगडाने डोक्यात व पायावर मारहान करुन गंभीर जखमी केले. त्यानंतर त्यांना पुढील उपचारासाठी शिरुर तसेच अहमदनगर येथील खाजगी दवाखान्यात दाखल करण्यात आले.

परंतु उपचारा दरम्यान बाळासाहेब माणिकराव गरुड यांचा दि १४ जानेवारी २०२४ रोजी मृत्यू झाला. याबाबत सचिन बाळु गरुड (वय २५) रा. चव्हाणवाडी ता. शिरुर जि.पुणे यांनी फिर्याद दाखल केल्याने संतोष रभाजी मोहीते आणि राहुल रभाजी मोहीते या दोघांवर शिरुर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असुन पोलिस निरीक्षक संजय जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक अभिजित पवार हे करत आहेत.

संबंधित लेख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!