कोरेगाव भीमा – डिंग्रजवाडी (ता.शिरूर) येथे सन १९९१-९२ या वर्षातील माजी विद्यार्थी व विदयार्थीनिंचा वर्ग भरला होता.यावेळी उपस्थित शिक्षकांचा फेटा बांधुन सत्कार करण्यात आला.
डिग्रजवाडी येथील जिल्हा परिषद शाळेतील सन १९९१-१९९२ या वर्षातील सातवीच्या वर्गतील माजी विद्यार्थी -विद्यार्थीनीचे स्नेह मेळव्याचा आयोजन करण्यात आले होते शिक्षक विद्यार्थी व विद्यार्थीनीला फेटा बांधून सत्कार करण्यात येऊन पुष्प गुच्छ देऊन स्वागत करण्यात आले यावेळी गुरुवर्य मुख्यधापक गोकुळे गुरुजी, शिक्षक वृंद अनिल माने गुरजी यांनी विदयार्थीना ज्ञानदान केल्याचा आनंद व्यक्त केला. सर्व विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले व गुरुजींनी पुढील वाटसाली साठी मार्गदर्शन केले. यामध्ये वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद गोकुळे यानी सर्व मुलांना मार्गदर्शन व पुढील वाटचाली साठी शुभच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे नियोजन व सुत्र संचालन मंगलदास फडतरे व संदिप गव्हाणे यांनी केले व सर्वांचे आभार मानले यावेळी ॲड सुरेखा चोरगे , मिना वाळके, शोभा साकोरे, स्वाती सव्वाशे , ललिता नानगुडे, कुंदा काळे, विदया मोरे, रतन वाळके, कांता भंडलकर , अनिता बवले , सुनिता कंद विद्यार्थी संतोष माकर, पोपट गव्हाणे, मनोहर फडतरे, अनिल गव्हाणे, माऊली गव्हाणे, निलेश गव्हाणे , मारुती नाबगे,दादाभाऊ गव्हाणे , मारुती पिंगळे उपस्थित होते