किल्ले सिंहगड प्रतिकृती पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी
कोरेगाव भिमा – शिक्रापूर (ता.शिरूर) येथील बालचमुंनी किल्ले सिंहगडाची हुबेहूब प्रतिकृती साकाराली असून मावळ्यांचा पेहराव घालत कंबरेला तलवार आणि गड आला पण सिंह गेला असे म्हणत जय भवानी जय शिवाजी अशा घोषणा देत ऐतिहासिक प्रसंग उभा करण्याचा प्रयत्न साई श्रद्धा प्रतिष्ठान शिक्रापूर ,साई सचिन करंजे साई राजाराम राठोड ,समर्थ सचिन करंजे, दर्शन राजाराम राठोड यांनी ही कलाकृती साकारली आहे.
दिवाळी म्हटले की लहान मुलांसाठी फटाक्यांची आतषबाजी, गोड खाऊ ,नवीन कपडे आणि किल्ले बनवण्यासाठी लगबग असे चित्र असते येथे बालचमुंनी किल्ले सिंहगडची प्रतिकृती हुबेहूब साकारली असून हा किल्ला शिक्रापूर परिसरातील नागरिकांचे व बालकांचे आकर्षण केंद्र ठरत आहे.किल्ला पाहिला की डोळ्यांचे पारणे फिटले असे वाटत असून बाल मावळ्यांचे कौतुक करण्यात येत आहे.
शिक्रापूर येथील साई श्रद्धा प्रतिष्ठान शिक्रापूर साई सचिन करंजे ,साई राजाराम राठोड ,समर्थ सचिन करंजे ,दर्शन राजाराम राठोड यांनी किल्ले शिवनेरीचे बारकाईने अभ्यास करत गडावरील सर्व ऐतिहासिक ठिकाणे साकारण्याचा प्रयत्न केला आहे.
यामध्ये झुंजारबुरूज: झुंजारबुरूज हे सिंहगडचे दक्षिण टोक होय.
डोणगिरीचा उर्फ तानाजी कडा : झुंजार बुरूजावरून मागे येऊन तटाच्या भिंतीच्या बाजूने पायवाटेने सुभेदार नरवीर तानाजी मालुसरे यांच्या कडाकडे जाता येते. हा कडा गडाच्या पश्चिमेस आहे. येथूनच तानाजी मावळ्यांसह वर चढले.
छत्रपती राजाराम महाराज स्मारक : राजस्थानी पद्धतीची रंगीत देवळासारखी जी घुमटी दिसते तीच छत्रपती राजाराम महाराज यांची समाधी. मोगली फौजेला सतत ११ वर्षे टक्कर देणाऱ्या राजाराम महाराजांचे वयाच्या अवघ्या ३० व्या वर्षी शनिवार दि. ३ मार्च इ.स. १७०० या दिवशी सिंहगडावर निधन झाले.
सुभेदार तानाजींचे स्मारक : अमृतेश्वराच्या मागच्या बाजूने वर गेल्यावर डाव्या बाजूस सुप्रसिद्ध सुभेदार तानाजींचे स्मारक दिसते. अशी माहिती साई व समर्थ करंजे यांनी दिली.
अभ्यासात हुशार असणाऱ्या या बालकांनी किल्ले सिंहगडचा अभ्यास करत इतिहासाचे मार्गदर्शन आपले आई वडील,आजी आजोबा यांच्या घेतले व यासाठी ऐतिहासिक पुस्तके व इंटरनेट चा प्रभावी वापर केला आहे.