सभासदांना दिवाळी फराळ व किरणाचे वाटप, फंडाच्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रम येतात राबविण्यात
कोरेगाव भिमा – कोरेगाव भीमा (ता.शिरूर) येथील अखिल मराठा समाज धर्मराज महाराज फंड मंडळ सभासदांना दिवाळी फराळ व किरणाचे चाळीस सभासदांना वाटप करण्यात आले असून याबाबत सभासदांनी आनंद व्यक्त केला. हा फंड मंडळ म्हणजे माणुसकीचे व स्नेहाचे नाते जपणारा एक परिवार असून एकमेकांच्या सुख दुक्षात सहभागी होत वैद्यकीय ,शैक्षणिक व इतर आर्थिक अडचणी सोडवत कुटुंबाचा मुख्य आधार असणारा विश्वसनीय घटक आहे.
कोरेगाव भिमा अखिल मराठा समाज धर्मराज महाराज फंड मंडळ जा सर्वात जुना व सामाजिक बांधिलकी जोपासत विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात अग्रेसर असणाऱ्या फंड मंडळ असून मंडळांच्या सभासदांकडून प्रत्येक महिन्याला सभासद वर्गणी जमा केले जाते आणि त्या वर्गणीच्या माध्यमातून गावात विविध विकास कामे केलेले आहेत.
कोरेगाव भीमा व वाडा पुनर्वसन येथील मंदिरचे सुशोभीकरण व परिसरात वॉल कंपाऊंड चे काम केले आहे. मंदिर स्थापनेपासून मंदिरातील मूर्तीचे दिवाबत्ती व हार याचा संपूर्ण खर्च फंड मंडळ करत आहे.फंड मंडळाच्या माध्यमातून हनुमान जयंती, धर्मराज महाराज उत्सव व लक्ष्मीपूजनाच्या अभिषेकाचा कार्यक्रम केला जातो.सभासदांच्या वैद्यकीय, शैक्षणिक व इतर आर्थिक आर्थिक अडचणी सोडवण्यासाठी मदत करत असून एकमेकांच्या सुखदुःखात सहबहगी होत माणुसकीचे व मैत्री हे अनोखे नेटागील अनेक वर्षांपासून जपण्यात मंडळ अग्रेसर आहे .
या फंड मंडळाचे काम उत्कृष्ट पध्दतीने वाडा गावचे माजी उपसरपंच व सोसायटी संचालक बाळासाहेब वाडेकर व शाळा व्यवस्थापन समितीचे माजी अध्यक्ष बाळासाहेब सावंत हे करत आहेत.याप्रसंगी कोरेगाव भिमाचे माजी सरपंच व विद्यमान ग्रामपंचायत सदस्य संदीप ढेरंगे व विनोद देशमुख यांनी आपले मनोगत व्यक्त केले व इरफान तांबोळी यांनी प्रास्ताविक केले