Thursday, November 21, 2024
Homeताज्या बातम्याश्री छत्रपती संभाजी महाराजांच्या समधिस्थळाचा तातडीने विकास करण्यात येणार - उपमुख्यमंत्री देवेंद्र...

श्री छत्रपती संभाजी महाराजांच्या समधिस्थळाचा तातडीने विकास करण्यात येणार – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

कोरेगाव भिमा – फुलगाव (ता.हवेली) स्वराज्य रक्षक श्री छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधी स्थळाचा विकास तातडीने करण्यात येणार असल्याचे आश्वासन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले असल्याची माहिती माजी सरपंच अंकुश शिवले, अनिल शिवले व ग्रामस्थांनी दिली.


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या एकत्रित प्रयत्नांनी स्वराज्यरक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या स्मारकाचा विकास आराखड्यानुसार तातडीने काम सुरू होईल ही अपेक्षा देशभरासह महाराष्ट्रातील शंभू (छञपती संभाजी महाराज) भक्तांना असून याबाबत श्री क्षेत्र वढू बुद्रुक ग्रामस्थांनी याबाबत निवेदन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले यावर उपमुख्यमंत्र्यांनी तातडीने छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकाचे काम सुरू करण्यात येणार असून याबाबत सरकार सकारात्मक असून हे स्मारक करण्यासाठी राज्यसरकार प्रयत्नशील असल्याचे सांगितले असल्याची प्रतिक्रिया माजी सरपंच अंकुश शिवले यांनी सांगितले.

    प्रदीप कंद व पुणे जिल्हा कुस्तीगीर संघ यांच्या संयुक्त विद्यमाने भारतीय कुस्ती महासंघ व महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाच्या सहकार्याने ६६ वी वरिष्ठ राज्य अजिंक्यपद व महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा हवेली तालुक्याच्या फुलगावमधील सुभाषचंद्र बोस सैनिकी शाळेमध्ये सुरू असणाऱ्या स्पर्धेसाठी मुख्य अतिथी म्हणून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते.यावेळी श्री क्षेत्र वढू बुद्रुक ग्रामस्थांनी त्यांची भेट घेतली.
  यावेळी माजी सरपंच अंकुश शिवले,उपसरपंच राहुल , ग्राम पंचायत सदस्य ज्ञानेश्वर भंडारे, कृष्णा आरगडे माजी चेअरमन सचिन शिवले, माजी उपसरपंच संतोष शिवले, मंगेश शिवले उपस्थित होते 
संबंधित लेख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!