Thursday, November 21, 2024
Homeताज्या बातम्यासोनपापडी विक्रेत्याचे सापडलेले ८४ हजार रुपये कोरेगाव भीमाचे माजी सरपंच आमोल गव्हाणे...

सोनपापडी विक्रेत्याचे सापडलेले ८४ हजार रुपये कोरेगाव भीमाचे माजी सरपंच आमोल गव्हाणे यांनी केले परत

कोरेगाव भीमा – कोरेगाव भीमा (ता.शिरूर) येथील माजी सरपंच अमोल गव्हाणे व राजे ग्रुपचे अध्यक्ष प्रदीप काशीद यांना वडापाव टपरीवर ८४ हजार रुपयांची पिशवी सापडली त्यांनी याबाबत चौकशी केली आणि काही वेळाने संबधित रकमेचे मालक कृष्णा भोगर हे आपल्या पैशांचा शोध घेत आले असता खात्री करून त्यांना ती रक्कम परत केली. माजी सरपंच अमोल गव्हाणे व राजे ग्रुपचे अध्यक्ष प्रदीप काशीद यांच्या प्रामाणिक पणाबद्दल कौतुक होत आहे.

समाजात आजही चांगले लोक असून स्पाडलेले तब्बल चौऱ्यांशी हजार परत करत प्रामाणिकपणाचे अनोखे दर्शन घडवत माणुसकी आजही  जिवंत असल्याचे उदाहरण पाहायला मिळाले असून सोन पापडी विक्रेत्याच्या कष्टाचे पैसे त्याला परत करत करत एक आगळा वेगळा आदर्श समाजासमोर ठेवलं आहे.

   सोनपापडी विक्रेते कृष्णा भोगर हे वडापाव खाण्यासाठी पवार   वडापावच्या गाडीवर थांबले व वडापाव खाऊन ते गडबडीत निघून गेले त्यानंतर तेथे कोरेगाव भीमाचे माजी सरपंच अमोल गव्हाणे व राजे ग्रुपचे अध्यक्ष प्रदीप काशीद हे तेथे आले त्यांना तब्बल ८४ हजार रुपयांची रक्कम असलेली  पिशवी दिसली याबाबत विचारपूस करता त्याबाबत कोणालाच काहीच सांगता येईना तब्बल दोन तासांनी सदर मालक कृष्णा भोगर गडबडीत आले पैशाच्या पिशविबाबत विचारणा करू लागले त्यावर माजी सरपंच अमोल गव्हाणे व अध्यक्ष प्रदीप काशीद यांनी खात्री करत ग्रामस्थांच्या उपस्थितीत सदर ८४ हजार रुपयांची रक्कम मूळ मालकाला परत करताण्यात आली.

    यावेळी  राजे ग्रुपचे अध्यक्ष प्रदीप काशिद  व सरपंच अमोल गव्हाणे, संतोष पवार, विकी गव्हाणे, ॠषी काशिद, संकेत शिंदे व शंभूराजे रिक्षा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष जयकांत फडतरे उपस्थित होते.

याबाबत सदर कृष्णा भोगर यांनी कोरेगाव भीमाचे माजी सरपंच अमोल गव्हाणे ,राजे ग्रुपचे अध्यक्ष प्रदीप काशीद यांचे आभार मानत आजही प्रामाणिक माणसे असून माणुसकी जिवंत आहे हे पैसे माझ्यासाठी खूप महत्त्वाचे असून त्यांचे आभार मानण्यासाठी माझ्याकडे शब्द नसल्याची प्रतिक्रिया दिली.

संबंधित लेख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!