दौंड पोलिसांची मोठी कारवाई एकाला २४ किलो गांजासह केले अटक
पुणे – दौंड
दिनांक २०सप्टेंबर रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक दौंड पोलीस स्टेशन हद्दीत गणपती उत्सव अनुषंगाने पेट्रोलिंग करीत असताना, स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला गोपनीय बातमीदारामार्फत मिळाली माहितीनुसार दौंड रेल्वे स्टेशनचे बाहेर एक इसम बेकायदेशीररित्या गांजा जवळ बाळगून विक्री करणार असल्याची माहिती मिळताच वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली व पुर्वपरवानगीने स्थानिक गुन्हे शाखा व दौंड पोलीस स्टेशनचे पथकाने दौंड रेल्वे स्टेशन येथे जावून छापा टाकला त्यावेळी सपन बेनीत बीर रा. अटली ता. नवगाडा जि. गजपती, ओरिसा हा मिळून आला त्याचे ताब्यात असणारे बॅगची झडती घेतली असता बॅगमध्ये प्लास्टिक चिकटपट्टीने गुंडाळलेले गठ्ठ्यांमध्ये एकूण २४ किलो ८५ ग्रॅम अंदाजे एकूण किंमत ३,७२,७५०/- गांजा हा विक्री करण्याचे उद्देशाने त्याचे कब्जात बाळगलेल्या स्थितीत मिळून आला आहे.
सदरची कारवाई पोलिस अधिक्षक अंकित गोयल , अप्पर पोलिस अधिक्षक आनंद भोईटे , उपविभागीय पोलिस अधिकारी दौंड विभाग दौंड स्वप्निल जाधव यांचे मार्गदर्शन खाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरीष्ठ पोलिस निरीक्षक अविनाश शिळीमकर, दौंड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पाटील, सपोनी राहुल गावडे, सहा. फौज. हनुमंत पासलकर, पो.हवा.सचिन घाडगे, आसिफ शेख, विजय कांचन, अजित भुजबळ, हेमंत विरोळे, रामदास बाबर, अतुल डेरे, चंद्रकांत जाधव, चा सहा. फौज. मुकुंद कदम यांनी केली आहे.