किरीट सोमय्या उपचारासाठी संचेती रुग्णालयात दाखल
प्रतीनिधी – मिलिंद लोहार
पुणे- भाजपा नेते किरीट सोमय्या यांच्या विरोधात पुण्यातील शिवसैनिक चांगलेच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. त्यांनी सोमय्या यांची गाडी अडवून गाडीवर हाताने ठोसे मारले. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे पुणे महानगर पालिकेच्या इमारतीसमोर एकच गोंधळ उडाला.
महापालिका आयुक्तांच्या भेटीसाठी आलेल्या किरीट सोमय्या यांच्यावर शिवसैनिक आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. सोमय्या यांना आयुक्ताची भेट न घेताच परतावे लागले. सोमय्या महापालिकेत येणार असल्याची माहिती मिळताच मोठ्या संख्येने शिवसैनिक महापालिकेत जमले होते. मात्र सोमय्या नवीन इमारतीच्या प्रवेशद्वारात येणार असल्याची माहिती मिळताच सर्व शिवसैनिक नव्या इमारती समोर गेले.यावेळी सोमय्या पुणे महापालिकेच्या इमारतीत प्रवेश करताना इमारतीत आधीपासूनच उपस्थित असलेल्या शिवसेना कार्यकर्त्यांनी त्यांना घेरले आणि झटापट झाली. त्यानंतर सोमय्या यांच्यासोबत असलेल्या सुरक्षा रक्षकांनी त्यांना बाहेर नेण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी झालेल्या झटापटीत सोमय्या पालिकेच्या पायऱ्यांवर पडले. त्यामध्ये ते जखमी झाले.
भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या पुणे दौऱ्यात आज राडा झाला. पुण्यातील शिवसेना कार्यकर्ते आणि किरीट सोमय्या यांच्यात झटापाट झाली. ते पालिकेच्या पायऱ्यांवरून खाली पडले तात्काळ त्यांना सुरक्षा रक्षकांनी गाडीत बसवले . या झटापटीत किरीट सोमय्या जखमी झाले असून उपचारांसाठी पुण्यातील संचेती रुग्णालयात दाखल झाले आहेत.