शिवेवरील आईच्या भेटीला, दोन देवींची भेट, मंदिराचा कलशारोहण व धार्मिक कार्यक्रम करत,सर्व जगच सुखी समाधानी, आनंदी राहूदे अशी सामूहिक प्रार्थना करत,निसर्गाशी जवळीक साधत जपली गावाची परंपरा
कोरेगाव भीमा – बकोरी (ता.शिरूर) येथील ग्रामस्थांनी एकत्र येत गावाचे गावपण व परंपरा जपली असून देवीची सवाद्य वाजत गाजत मिरवणूक, मरीआई आणि शिवेचि आई यांची भेट घडवून आणत, मंदिराचे कलशारोहण, धार्मिक कार्यक्रम व सोबत नेवैद्य दाखवत गावाची पूर्वापार परंपरा व लोकसंस्कृती,ग्राम संस्कृती जपली असून याची सर्वत्र मोठ्या प्रमाणावर चर्चा होत आहे.
पूर्व हवेली तालुक्यातील आदर्श असणाऱ्या बकोरी या गावाने दरवर्षी आपली ग्रामसंस्कृती व लोकसंस्कृती मोठ्या श्रद्धेने जपली असून गावातून वाजत गाजत मरीआई (मरियाई) देवीची मिरवणूक काढली यामध्ये अबालवृद्ध सहभागी झाले होते,पर्मापरिक वेशात महिला भगिनी होत्या, पुढे पोतराज हलगी व इतर वाद्यांच्या गजरात देवीची आराधना करत गावच्या शिवेला असणाऱ्या शिवेच्या आईची भेट घडवण्यात आली.यावेळी बकोरीतील ग्रामस्थांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला असून या उत्सवाला ग्रामस्थांची मोठी पसंती मिळत असून पुढील वर्षी अनेक नागरिक सहकुटुंब सहभागी होणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली.
यावेळी रेड्याचे पूजन करण्यात येऊन प्राण्यांविषयी ममत्व, दया व प्रेम भावनेचा अनोखा संदेश देण्यात आला.तसेच निसर्गाशी जवळीकता साधत वृक्ष संवर्धन गरजेचे असून निसर्ग जपण्याचे व लोकसंस्कृती टिकविण्याचा कृतीयुक्त संदेश देण्यात आला
सर्व ग्रामस्थ,सरपंच,उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य ,आजी माजी,पदधिकारी ,तरुण कार्यकर्ते,महिला मंडळ सालाबादप्रमाणे उपस्थित राहुन गांवासाठी प्रार्थना केली जाते.